Apne 2 | देओल घराण्याच्या तीन पिढ्या एकत्र झळकणार, अभिनेते धर्मेंद्रकडून ‘अपने 2’ची घोषणा!

धर्मेंद्र (Dharmendra Deol) आणि सनी देओल ‘अपने 2’ची (Apne 2) घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

Apne 2 | देओल घराण्याच्या तीन पिढ्या एकत्र झळकणार, अभिनेते धर्मेंद्रकडून ‘अपने 2’ची घोषणा!
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 3:13 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘अपने 2’ (Apne 2) चित्रपटाविषयी अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता खुद्द धर्मेंद्र (Dharmendra Deol) आणि सनी देओल ‘अपने 2’ची घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याच बरोबर या चित्रपटाच्या कास्टमध्ये खास ट्विस्ट आणला आहे (Dharmendra Deol Announces Next film Apne 2).

‘अपने 2’ ता चित्रपटात देओल कुटुंबातील तीन पिढ्या झळकणार आहेत. धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल व्यतिरिक्त करण देओलही ‘अपने 2’मध्ये दिसणार आहेत. सनी देओलचा मुलगा करण या चित्रपटाचा एक भाग झाल्यामुळे त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘अपने 2’ या चित्रपटाची पहिली झलक पोस्ट करताना करताना त्यांनी लिहिले – ‘त्याच्या (देवाच्या) आशीर्वादाने आणि तुमच्या शुभेच्छांमुळे, आम्ही ‘अपने 2’ तुमच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.’

(Dharmendra Deol Announces Next film Apne 2)

पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

सनी देओलनेही चित्रपटाची घोषणा करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. सनी देओल यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘बाबाजींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही आज पुन्हा एकत्र आलो आहोत. मला माझे वडील, भाऊ आणि मुलासह काम करण्याची संधी मिळत आहे, याचा खूप आनंद आहे. ‘अपने 2’ 2021च्या दिवाळीमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.’(Dharmendra Deol Announces Next film Apne 2)

(Dharmendra Deol Announces Next film Apne 2)

चित्रीकरणासाठी मी उत्सुक : धर्मेंद्र

‘अपने 2’मध्ये सनी, बॉबी आणि करण सोबत काम करण्याबद्दल धर्मेंद्र उत्साहित आहे. चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की,  ‘अपने’ माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. संपूर्ण युनिटच्या प्रशंसनीय प्रयत्नांमुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही मी खूप आनंदी आहे. कारण ‘अपने 2’मध्ये मला माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत म्हणजेच सनी, बॉबी आणि नातू करण यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असेल आणि मी उत्सुकतेने चित्रीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.’

मीडिया रिपोर्टनुसार, ‘अपने 2’ चित्रपटाचे चित्रीकरण मार्च 2021मध्ये सुरू होईल. चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब आणि युरोपमध्ये होणार आहे. याआधी ‘अपने’ हा चित्रपट 2007मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात किरण खेर, शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.

(Dharmendra Deol Announces Next film Apne 2)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.