आजोबाकडून नातू लाँच, देओल घराण्याची तिसरी पिढी पडद्यावर
बॉलिवूडचं अॅक्शन घराणं म्हणजेच देओल घराण्यातील तिसरी पिढी आता मोठ्या पडद्यावर चमकणार आहे (Karan Deol Bollywood Debut). अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा मुलगा करण देओल (Karan Deol) हा 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे.
मुंबई : बॉलिवूडचं अॅक्शन घराणं म्हणजेच देओल घराण्यातील तिसरी पिढी आता मोठ्या पडद्यावर चमकणार आहे (Karan Deol Bollywood Debut). अभिनेता धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा करण देओल (Karan Deol) हा ‘पल पल दिल के पास’ (Pal Pal Dil Ke Paas) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. करणच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला (Pal Pal Dil Ke Paas movie trailer launch). नातवाला सपोर्ट करण्यासाठी खुद्द धर्मेंद्र या लाँचवेळी उपस्थित होते. तसेच, त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर ट्वीट केला.
‘हर दौर अपने प्यार की कहानी खुद लिखता है. यह इस दौर की कहानी है’, या कॅप्शनसोबत धर्मेंद्र यांनी ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाचा ट्रेलर ट्वीट केला.
Har daur apne pyaar ki kahani khud likhta hai. Yeh iss daur ki prem kahani hai! Presenting the trailer of #PalPalDilKePaas: https://t.co/WEJw0aPJyk#KaranDeol #SahherBambba @iamsunnydeol @shariqpatel @ZeeStudios_ @SunnySuperSound @ZeeMusicCompany #PalPalDilKePaasTrailer
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 5, 2019
‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून करण देओल आणि अभिनेत्री सहर बाम्बा (Sahher Bambba) हे दोघेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तर अभिनेता सनी देओलने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
गुरुवारी (5 सप्टेंबर) ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी सिनेमाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. मात्र, सनी देओल या लाँचला गैरहजर होते. सनी देओल बटाला फॅक्ट्री स्फोट पीडितांची भेट घेण्यासाठी गुरदासपूरला गेले असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र, त्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच, नातवाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी धर्मेंद्र यांनी या लाँचला उपस्थिती लावली. यावेळी करणने आजोबा धर्मेंद्र यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
Every generation has a story to tell. Come witness the biggest love story of this generation. Presenting the trailer of #PalPalDilKePaas: https://t.co/ZjLtT080mH
— Sunny Deol (@iamsunnydeol) September 5, 2019
‘पल पल दिल के पास’ हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल हे पहिल्यांदा दिग्दशन क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.
पाहा व्हिडीओ :