गुजराती गाण्यावर धोनीचा ठेका, गरबा खेळतानाचा हा व्हिडीओ पाहिलाय का?, अंबानींच्या सोहळ्यात फुलटू धम्माल
फलंदाजीला आल्यावर बॅट हातात धरून समोरच्या बॉलरची गोलंदाजी फोडून काढणाऱ्या धोनीचा एक अनोखा अंदाज पहायला मिळाला. अंबानींच्या फंक्शनमध्ये धोनी चक्क दांडिया खेळताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय.
M.S.Dhoni : जामनगरमध्ये अंबानी कुटुंबातील लग्नाची धामधूम जोरात सुरू आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी अंबानी कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, मोठे दिग्गज उद्योगपती, इंटरनॅशनल स्टार्सही उपस्थित होते. 1 मार्चपासून सुरू झालेल्या फंक्शन्समध्ये पहिल्या दिवशी पॉपस्टार रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स झाला. तर दुसऱ्या दिवशी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना खास परफॉर्मन्स दिला. मात्र या सगळ्यात सध्या एक वेगळाच व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, तो आहे स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा. त्याने चक्क गुजराती गाण्यावर डान्स केला.
कॅप्टन कूलचा अनोखा अंदाज
कॅप्टन कूल अशी धोनीची ख्याती. शांत मनाने, चक्रव्यूह रचून खेळणारा धोनी असला की विजय आपला हीच सर्वांना खात्री असायची. फलंदाजीला आल्यावर बॅट हातात धरून समोरच्या बॉलरची गोलंदाजी फोडून काढणाऱ्या धोनीचा एक अनोखा अंदाज पहायला मिळाला. अंबानींच्या फंक्शनमध्ये धोनी चक्क दांडिया खेळताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून चाहते त्याचा हा अंदाज पाहून थक्क झाले आहेत.
Dhoni, Sakshi, Bravo playing Dandiya at the Pre-Wedding of Anant Ambani. 👌
– A beautiful video…..!!!pic.twitter.com/dDUY3nppIb
— Johns. (@CricCrazyJohns) March 3, 2024
धोनीने साक्षीसह धरला ठेका
अंबानी कुटंबाच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी बॉलिवूड कलाकारांचे शानदार परफॉर्मन्स झाले. त्याचदरम्यान धोनीच्या डान्सचाही व्हिडीओ समोर आले आहे. यामध्ये धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि डॅरेन ब्राव्हो हाही दिसत आहे. धोनीच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्याचा हा अनोख अंदाज पाहून चाहते आनंदले आहेत. क्रीम कलरच्या कुर्त्यातील धोनी आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला डरेन ब्राव्हो दांडिया खेळत आनंद लुटताना दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारी धोनीची पत्नी साक्षी धोनीही पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. दोघांचाही डान्स बघतानाचा एकीकडे तिनेही गाण्यावर ठेका धरला. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव झाला.
View this post on Instagram