दोन-दोन लग्नांनंतरही धर्मेंद्र ‘या’ अभिनेत्रीवर झाले होते फिदा, का तुटलं त्यांचं नातं ?
प्रकाश कौर आणि हेमामालिनी यांच्याशी लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र यांची एका अभिनेत्रीशी जवळीक वाढू लागली होती. अनेक चित्रपटांत एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यात नातं असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
Dharmendra Unknown Facts : ते जेव्हाही मोठ्या पडद्यावर येतात, तेव्हा धमाल करतात. ओळखलं का आपण कोणाबद्दल बोलतोय ? तो अभिनेता म्हणजे धर्मेंद्र… देखणा, दिलदार असे धर्मेंद्र (Dharmendra) हे पडद्यावर आल्यावर शिट्ट्यांचा पाऊस पडायचा. लहान-मोठे सर्वच त्यांच्यावर फिदा व्हायचे. मात्र त्यांच्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ? दोन-दोन लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्र पुन्हा प्रेमात पडले होते, असं म्हटलं जातं.
अशी होती धर्मेंद्र यांची लव्ह लाईफ
चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा विषय निघाला अन् धर्मेंद्र यांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्य आहे. त्यांच्या काळात सर्व सौंदर्यवतींच्या हृदयावर ते जादू करत. धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्याही बरेच चर्चेत असायचे. त्यांच्या दोन लग्नांबद्दल तर सर्वांनाच माहित आहे, पण या दोन लग्नानंतरही धर्मेंद्र हे तिसऱ्या महिलेकडे आकर्षित झाले होते, हे तुम्हाला माहीत आहे ? ती अभिनेत्री कोण होती माहित्ये का ?
धर्मेंद्र यांनी केली होती दोन लग्नं
1954 साली केवळ 19 वर्षांचे असलेल्या धर्मेंद्र यांचा विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला होता. या जोडप्याला अजय , विजय सिंग (बॉबी देओल) , विजेता आणि अजिता देओल अशी चार मुले होती. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते, पण 80 च्या दशकात धर्मेंद्र यांची हेमा मालिनी यांच्याशी भेट झाली. त्यांना पाहताच धर्मेंद्र यांच्या त्यांच्यावर जीव जडला आणि एक-दिवशी त्यांनी हेमामालिनी यांना त्यांच्या मनातील भावना सांगितल्या.
मात्र आधीच विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांचा स्वीकार करणं सोपं नव्हतं, अखेर त्यानी इस्लाम धर्म स्वीकारला आणि ते दोघे विवाहबद्ध झाले.
दोन लग्नांनंतर तिसरीची एंट्री ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन लग्नानंतरही धर्मेंद्रच्या आयुष्यात तिसऱ्या महिलेची एंट्री होती. ही सुंदरी दुसरी कोणी नव्हे, तर त्या काळातील सुंदर अभिनेत्री अनिता राज ही होती. धर्मेंद्र आणि अनिता यांनी ‘जलजला’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘इन्सानियत के दुश्मन’ आणि ‘नौकर बीवी का’ यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
हेमा मालिनी यांच्या रागामुळे तुटलं नातं
अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना धर्मेंद्र आणि अनिता हे एकमेकांच्या खूप जवळ आल्याचे म्हचले जाते. रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी धर्मेंद्र हे अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना अनिता राजला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेण्याचा सल्ला देत होते. मात्र हळूहळू हेमा मालिनी यांना या प्रकरणाची कुणकूण लागली आणि त्यांनी रौद्ररूप धारण केले. त्यानंतरच धर्मेंद्र हे अनिता राजपासून दुरावले, असे म्हटले जाते.