Anant Ambani : वडील अब्जाधीश, पण पहिल्या कमाईसाठी अनंत अंबानीने विकले होते फुगे ! किती कमावली रक्कम ?
अनंत-शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये शाहरुखने त्याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितलं होतं. माझी पहिली कमाई 50 रुपये होती असं शाहरुख म्हणाला.
नुकताच अनंत अंबानींचा शाहरुख खानसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनंत त्याच्या पहिल्या कमाईबद्दल बोलत आहेत. अब्जाधीश वडील असलेल्या अनंत अंबानीची पहिली कमाई किती होती माहीत आहे का ?
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच त्यांची तीनही मुल आकाश, ईशा आणि अनंत यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बिझनेसमध्ये यशस्वी बस्तान बसवलं आहे. अनंत अंबानी याचा काही महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राधिका मर्चंट हिच्याशी झालेला विवाह खूप गाजला. अनेक दिवस या सोहळ्याचे विविध विधि, समारंभ सुरू होते. फक्त देशातील सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणीच नव्हे तर जगभरातील मान्यवर व्यक्तीही या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
याचदरम्यान अनंत अंबानीचा एक जुना व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून पुन्हा चर्चेत आला आहे. ज्याचे वडील अब्जाधीश आहेत, त्याचं अनंत अंबानीने त्याच्या आयुष्यातील पहिल्या कमाईसाठी काय केलं होतं हे या व्हिडीओतून समोर आलंय. त्याने चक्क फुगे विकले होते. अनंतची पहिली कमाई किती होती हे तुम्हाला माहित आहे का ?
शाहरूखच्या पहिल्या कमाईपेक्षाही अनंतने कमावले जास्त पैसे
अनंत-शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये शाहरुखने त्याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगितलं होतं. माझी पहिली कमाई 50 रुपये होती असं शाहरुख म्हणाला आणि त्यानंतर त्याने अनंतला त्याच्या पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारला. त्यावर अनंतने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वच अवाक् झाले. तुम्हाला लाज वाटेल, राहू द्या असं अनंत गमतीने शाहरुखला म्हणाला. नंतर त्याने त्याची पहिली कमाई कशी केली आणि किती रुपये कमावले ते सांगितलं.
फुगे विकून कमावले पैसे
शाहरुखने सांगितलं की अनंत लहान मुलगा होता आणि आजोबा धीरूभाई अंबानी यांच्यासोबत फिरायला गेला होता. तेव्हा त्याने 15 रुपयांचा फुगा विकत घेतला होता. ते पाहून त्याला आयडिया सुचला. तिथून त्याने 2 रुपयांचं फुग्याचं पाकिट खरेदी केलं, त्यात हवा भरली आणि ते फुगवून ते फुगे विकले. अशा तऱ्हेने त्याने त्याची पहिली कमाई केली. अनंतने शाहरुख खान याच्यापेक्षाही जास्त कमाई केली होती.