Kangana Ranaut | कंगनासोबत काम करणार नाही, राम गोपाल वर्मांचा निर्धार, ‘थलायवी’वर केले मोठे वक्तव्य!

प्रमोशन दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी कंगना रनौतवर (Kangana Ranaut) ट्विट केले असून, ‘थलायावी’मध्ये कंगना असू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

Kangana Ranaut | कंगनासोबत काम करणार नाही, राम गोपाल वर्मांचा निर्धार, ‘थलायवी’वर केले मोठे वक्तव्य!
राम गोपाल वर्मा आणि कंगना रनौत
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 12:03 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या आपल्या आगामी ‘डी’ कंपनीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी कंगना रनौतवर (Kangana Ranaut) ट्विट केले असून, ‘थलायावी’मध्ये कंगना असू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी त्यांनी कंगनाबद्दल इतरत्र बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. जयललिता यांच्या बायोपिकसाठी एखादी 50 वर्षांची अभिनेत्री कास्ट करायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे (Director producer Ram Gopal Varma does not want to see kangana Ranaut in Thalaivi).

अलीकडेच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रामगोपाल वर्मा यांनी, कंगनाचे कौतुक केले. मात्र, तिच्याबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की, कंगना आणि मी एकत्र कधी चित्रपट करु शकू. कंगनाची प्रतिमा मिक्स बॅगची आहे. तिने कोणत्या प्रकारची भूमिका साकारली तरी, ते पाहून पात्रं तिच्या वास्तविक जीवनासारखंच असल्यासारखं वाटतं. कंगनासाठी माझ्या मनात कोणतीही कथा किंवा प्रोजेक्ट नाही.’

‘थलायवी’च्या भूमिकेत कंगना पाहू शकत नाही!

जयललिता यांच्या बायोपिकची झलक पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘मला थलायवीबद्दल खात्री नाही. दक्षिणेत जयललिताची ख्याती पाहता, मला त्या भूमिकेत कंगना पहायला आवडणार नाही.’ ते पुढे म्हणाले की, जयललिताच्या भूमिकेसाठी 50-60 वयोगटाच्या अभिनेत्रीला कास्ट करायला हवे होते. कारण, 50 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही अभिनेत्री या पात्राला न्याय देऊ शकणार नाही. जयललिता यांची कीर्ती आपल्या सर्वांना माहित आहे. या पात्रासाठी अभिनेत्री निवडताना, ती त्यांच्यासारखी दिसेल किंवा असेल, याची काळजी घ्यायला हवी होती.’(Director producer Ram Gopal Varma does not want to see kangana Ranaut in Thalaivi)

जयललिता यांचे पात्र कधीच कंगनाला दिले नसते!

राम गोपाल वर्मा म्हणाले की, ‘मला संधी मिळाली असती तर, मणिकर्णिकासारख्या चित्रपटात मी कंगनाला कास्ट करेन. कारण तिच्या याच अवतारात चाहत्यांना ती आवडते. मी तिची तीच प्रतिमा चाहत्यांना दाखवली असती. कंगनाचे व्यक्तिमत्त्व जयललितापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, यामुळे या भूमिकेसाठी तीची निवड योग्य नाही.’

‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीझ

‘जयललिता’ यांच्या जयंती वर्धापन दिनानिमित्त कंगना रनौतने ‘थलायवी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना रनौतने ट्विटद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. जयललितांचा अभिनेत्री ते राजकारण्यापर्यंतचा प्रवास थलायवीमध्ये दाखवण्यात येणार आहे.

कंगना रनौतने थलायवीची रिलीज डेट जाहीर केली आहे. कंगनाने ट्विट केले, ‘जया अम्मा यांच्या जयंतीनिमित्त. आख्यायिकेच्या कथेचा एक भाग व्हा. थलायवी 23 एप्रिल 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार.’ मोशन पोस्टरमध्ये जयललितांचा व्हॉईस-ओव्हरसह उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, ‘जेव्हा ती चित्रपटात आली तेव्हा सिनेमाचे चित्र बदलले. राजकारणात येताच त्यांनी तमिळनाडूचे भाग्य बदलले. तिने स्वत:ची कथा लिहून एक नवा इतिहास रचला. कोटींचे भविष्य बदलल्यानंतर ती एक ‘थलायवी’ बनली.’

(Director producer Ram Gopal Varma does not want to see kangana Ranaut in Thalaivi)

हेही वाचा :

Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?

Taimur Ali Khan | छोट्या भावाच्या आगमनानंतर तैमुर झाला जबाबदार, आई करीनाला दिलं खास गिफ्ट!

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.