Sushant Singh Suicide | दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही चौकशीला बोलावलं
संजय लीला भन्साळी यांनी 'राम लीला'हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात भन्साळी हे सुशांत सिंग याला मुख्य भूमिकेत घेणार होते.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Sanjay Leela Bhansali To Be Questioned In Sushant Singh Rajput Suicide Case) आज दोन पत्रकारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर उद्या प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात 30 जणांची चौकशी झाली आहे. तर अभिनेता एजाज खान याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे (Sanjay Leela Bhansali To Be Questioned In Sushant Singh Rajput Suicide Case).
आज एका वेब पोर्टलच्या दोन पत्रकारांची चौकशी करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या संपादकांची आणि एका पत्रकाराची चौकशी करुन त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. या वेब पोर्टलवर काही महिन्यांपूर्वी सुशांत सिंहविरोधात बातमी छापण्यात आली होती. सुशांत सिंह हा आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये मोठमोठ्याने लाऊड स्पिकर लावून धिंगाणा घालत असतो. याबाबत त्याला सोसायटीच्या सदस्यांनी वेळोवेळी समज दिली होती. याबाबतची ही बातमी होती. ही बातमी कोणी दिली, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
सुशांत याला सतत वाटत होतं की, त्याच्या विरोधात कोणी तरी आहे. तो व्यक्ती त्याच्या विरोधात बातम्या छापून आणत असतो. याच मुद्यावर पोलीस तपास करत आहेत.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी होणार
याप्रकरणी उद्या (3 जुलै) एक बड्या व्यक्तीची चौकशी होणार आहे. ही व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे (Sanjay Leela Bhansali To Be Questioned In Sushant Singh Rajput Suicide Case).
संजय लीला भन्साळींची चौकशी का?
संजय लीला भन्साळी यांनी ‘राम लीला’हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात भन्साळी हे सुशांत सिंग याला मुख्य भूमिकेत घेणार होते. मात्र, सुशांत याचा यशराज फिल्म्ससोबत करार असल्याने सुशांतला घेता आलं नाही. करण, यश राज फिल्म्सने त्याला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे भन्साळींनी ‘राम लीला’मध्ये अभिनेता रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेतलं.
‘राम लीला’ हा चित्रपट हिट झाला होता. आपल्याला या चित्रपटात काम करता आलं नाही, याचं सुशांतला दुःख होत. तसं त्याने ते व्यक्तही केलं होतं. यशराज फिल्म्समुळे आपल्याला हा चित्रपट करता आला नाही, असं त्याचं म्हणणं होतं. यासर्व पार्श्वभूमीवर आता संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार आहे.
संजय लीला भन्साळी यांना पोलिसांनी आज समन्स बजावला आहे. येत्या एक दोन दिवसात संजय लीला भन्साळी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी : एजाज खान
अभिनेता एजाज खान याने आज सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्याने केली आहे.
Sushant Singh Rajput | गाड्यांपासून मोबाईलपर्यंत एकच नंबर, सुशांतच्या लकी नंबरच्या गाड्यांचा लवकरच लिलाव?https://t.co/kzpqAe4FZT#SushantSinghRajput #sushantsinghrajputsuicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2020
Sanjay Leela Bhansali To Be Questioned In Sushant Singh Rajput Suicide Case
संबंधित बातम्या :
Bollywood Celebrities | 2020 च्या सहा महिन्यात मनोरंजन विश्वाने गमावले 20 हिरे!