मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टायगर आणि दिशाच्या नात्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत होती. पण आता दोघे विभक्त झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा तिच्या सिनेमांमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आता देखील दिशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. टायगरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री अलेक्जेंडर एलेक्स एलिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
खुद्द अलेक्जेंडर एलेक्स एलिक याने दिशासोबत काही खास फोटो पोस्ट केले आहेत. सध्या एलिक आणि दिशाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, एलिक आणि दिशाच्या फोटोंवर टायगरची बहिण कृष्णा श्रॉफने कमेंट केली आहे. दिशाचे बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि कृष्णाच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
एलिक आणि दिशाच्या फोटोंवर कृष्णा पोस्ट करत म्हणाली, ‘या फोटोंनंतर जर कोणी लिहित असेल, तर त्यांनी लिहिल्या गोष्टी वाचण्याची प्रतीक्षा नाही करू शकत…’ कृष्णाच्या कमेंटवरून कळत आहे की, तिने नेटकऱ्यांना उद्देशूनच हे वाक्य लिहिलं आहे. सध्या सर्वत्र दिशाच्या फोटोंची चर्चा आहे.
सांगायचं झालं तर, दिशा आणि टायगरचं ब्रेकअप झालं आहे, पण आजही श्रॉफ कुटुंबासोबत अभिनेत्री संबंध फार खास आहेत. एवढंच नाही, तर दिशाचा बॉयफ्रेंड अलेक्जेंडर एलेक्स एलिक याच्यासोबत कृष्णाची खास मैत्री आहे. अनेक ठिकाणी एलिक आणि दिशा यांच्यासोबत कृष्णाला देखील स्पॉट करण्यात आलं आहे.
शिवाय तिघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. महत्त्वाचं म्हणजे आता एलिकने दिशासोबत फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दिशा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
इन्स्टाग्रामवर दिशाचे जवळपास ५५.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.