Divya Bharti | वाईट वाटल्यावर स्वतःलाच करायची दुखापत, मुलाखती दरम्यान दिव्या भारतीच्या आईचा दावा!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) हीचा मृत्यू अवघ्या जगासाठी आजही एक रहस्य आहे. तिचा चित्रपट सृष्टीतील प्रवास फार काळ टिकू शकला नाही. परंतु, कमी काळाच्या कारकीर्दीतही तिने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले.

Divya Bharti | वाईट वाटल्यावर स्वतःलाच करायची दुखापत, मुलाखती दरम्यान दिव्या भारतीच्या आईचा दावा!
दिव्या भारती
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 3:37 PM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) हीचा मृत्यू अवघ्या जगासाठी आजही एक रहस्य आहे. तिचा चित्रपट सृष्टीतील प्रवास फार काळ टिकू शकला नाही. परंतु, कमी काळाच्या कारकीर्दीतही तिने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. अवघ्या 3 वर्षांच्या कारकीर्दीत ती दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री बनली होती. त्यानंतर 5 एप्रिल 1993ला अचानक तिच्या मृत्यूची बातमी समोर आली. काहींनी तिचा मृत्यू अपघात, काहींनी आत्महत्या आणि काहींनी कट रचल्याचे म्हटले होते. आपली आवडती स्टार दिव्या आता या जगात नाही यावर चाहत्यांना विश्वासच बसत नव्हता. त्याच वेळी, या प्रकरणाशी जोडले गेलेले लोक आजपर्यंत या धक्क्यातून सावरू शकले नाहीत (Divya Bharti Death Anniversary her mother reveal unknown things about her).

साजिदवर व्यक्त केली शंका

दिव्या भारती त्या दिवशी एका अपघातामुळे हे जग सोडून निघून गेली. अपार्टमेंटच्या खिडकीतून पडल्याने तिचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले होते. त्याचवेळी अनेकांनी तिचा नवरा साजिद नाडियाडवाला यांच्याबद्दलही शंका उपस्थित केली. मात्र, साजिदने बर्‍याच वेळा मुलाखतीत सांगितले आहे की, दिव्याला अजूनही त्याच्या घरी समान आदर आहे. तो नेहमीच पर्समध्ये तिचा फोटो ठेवतो. त्याची मुलं दिव्याला ‘मोठी आई’ म्हणतात. दिव्या भारतीची आई मीता यांनीही तिच्या निधनानंतर अनेक मुलाखती दिल्या आहेत. मुलीच्या मृत्यूचे कारण काय आहे, हे मला यापुढे जाणून घेण्याची इच्छा नसल्याचे आता त्यांनी म्हटले होते.

त्यादिवशी दिव्याने रम घेतली होती!

दिव्या भारती यांच्या मृत्यूविषयी अनेक दावे आणि बातम्या चर्चेत होती. काही जण असेही म्हणाले की, ती मादक पदार्थांच्या नशेत होती. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत दिव्याच्या आईने सांगितले की, घटनेच्या दिवशी दिव्याने रम घेतली होती, पण ती ड्रग्ज घेत नव्हती. या मुलाखतीत दिव्याच्या आईने अनेक धक्कादायक खुलासे केले होते (Divya Bharti Death Anniversary her mother reveal unknown things about her).

दिव्या रागाच्या भरात स्वत:ला दुखापत करायची!

रागाच्या भरात दिव्या भारती स्वतःला नुकसान करायची, असे देखील तिच्या आईने सांगितले होते. तिचा मृत्यू होण्यापूर्वी काही दिवस ती स्वत:ला दुखापत करत होती. दिव्याने तिचे मनगट देखील कापले होते. हातावरही सिगारेटने चटके दिले होते. तिच्या आईने तिच्या मनगटावर कापलेल्या खूण पाहिल्या. दिव्या भारतीच्या निधनानंतर आई मीता बर्‍याच वर्षांपासून नैराश्यात होती. मुलाखतीत हा एक विचित्र योगायोग असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. जेव्हा जेव्हा त्यांना लवकर जागे व्हायचे असयाचे, तेव्हा दिव्या भारती त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना उठवायची. दुसरीकडे, साजिद नाडियाडवालाची पत्नी वर्धानेही सांगितले की, जवळपास 6 वर्ष दिव्या तिच्या स्वप्नात येत होती.

(Divya Bharti Death Anniversary her mother reveal unknown things about her)

हेही वाचा :

Video | महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला अन् शिल्पा शेट्टीने नवऱ्याच्या हातात झाडू दिला! पाहा धमाल व्हिडीओ…

भाऊ शौविकसह रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा NCB ऑफिसमध्ये दाखल, वाचा नेमकं काय झालं…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.