मला पट्ट्याने मारलं, लैंगिक शोषण केलं, माझा नवरा हैवान आहे; दिव्या भटनागरच्या चॅटमधील खुलासा

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनेदेखील गगन गबरुबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यातच आता अभिनेत्री आकांशा मल्होत्राने दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

मला पट्ट्याने मारलं, लैंगिक शोषण केलं, माझा नवरा हैवान आहे; दिव्या भटनागरच्या चॅटमधील खुलासा
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 8:16 PM

मुंबई : टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेत्री दिव्या भटनागरच्या (Divya Bhatnagar) निधनानंतर तिचे चाहते खूप दुःखी झाले आहेत. दरम्यान दिव्याच्या निधनानंतर तिचा पती गगन गबरू आणि तिच्या नात्याबद्दलचे जे खुलासे झाले आहेत, त्याने अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनेदेखील गगनबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यातच आता अभिनेत्री आकांशा मल्होत्राने दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स सोशल मिडियावर शेअर केले आहेत. दिव्या आणि आकांशामधील चॅट वाचल्यावर एक बाब निश्चित झाली आहे की, गगन दिव्यावर खूप अत्याचार करत होता, तिचा खूप छळ करत होता. त्यामुळे दिव्या आणि गगनचे संबंध तानले गेले होते. या चॅटमधून एक बाब समोर आली आहे की, गगन दिव्याला धमकी द्यायचा की, तो तिच्या जागी एक सडपातळ नोकरानी आणणार आहे, जी त्याला सूख देईल.

आकांशा ने दिव्यासोबतच्या चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की, गगन दिव्याचा खूप छळ करत होता. या चॅट्समध्ये दिव्याने सांगितलं आहे की, गगन तिला बेल्टने (पट्ट्याने) मारायचा. दरम्यान दिव्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रेटीज तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देवोलीना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिव्या भटनागरला झालेल्या जखमांचे काही फोटो शेअर केले होते. या पोस्टसोबत देवोलीनाने गगनविरोधातील FIR ची कॉपीदेखील शेअर केली होती. अशी माहिती मिळाली आहे की, करवा चौथच्या दिवशी गगन आणि दिव्याचं मोठं भांडण झालं होतं. हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. या घटनेनंतर दिव्याने एफआयआर दाखल केली होती.

देवोलीनाने एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. त्यात तिने म्हटलं होतं की, गगनची अनेक नावं आहेत. तो एक फसवणूक करणारा फ्रॉड माणूस आहे. दिव्याने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल फॅन्सना सांगितलं होतं. ती तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमच्याशी थेट कधी बोलली नाही, मात्र ती तिच्या चाहत्यांशी गप्पा मारायची.

इतर बातम्या

Shocking : अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

बॉलिवूड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतदेह मिळाला

अभिनेत्री आर्या बॅनर्जी मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ‘हे’ आले समोर!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.