दिव्यांग मुलीला डायरेक्टर संतोष पवार दाखवणार मोफत नाटक

हौस माझी पुरवा नाटक मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहात होतं. तिथं नाट्यरसिक अधिक आलं होतं. त्याचबरोबर त्यांनी प्रेक्षकांना नाटक अधिक आवडल्याने रसिक कलाकारांना भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रूममध्ये आला होता.

दिव्यांग मुलीला डायरेक्टर संतोष पवार दाखवणार मोफत नाटक
संतोष पवार
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:45 AM

मुंबई – संतोष पवार (santosh pawar) यांचं नाव कानावर पडलं की त्यांचा नाटकातला एखादा विनोदी संवाद तुमच्या डोळ्यासमोर येतो. कारण आत्तपर्यंत त्यांनी 55 नाटकामधून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं आहे. सध्या त्याचं हौस माझी पुरवा (hous mazi purava) आणि सुंदरा मनात भरली ही नाटकं नाट्यगृहात पाहायला मिळत आहेत. नाटकात एखादा विनोद तात्काळ तयार करण्याचं ते अग्रसर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुलुंडच्या (mulund)कालिदास नाट्यगृहात नाटक पाहायला आलेल्या दृष्टीहीन मुलीस त्यांनी यापुढं तिची नाटक पाहायची इच्छा त्यावेळी मोफत दाखवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं त्यांनी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. नाटकाचा प्रेक्षकवर्ग कोरोनाच्या काळात घरी बसून होता. आता तो हळूहळू नाट्यगृहात यायला लागला आहे. परंतु नाट्यगृहात देखील 50 टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य असल्याने अनेकांची कुचंबना होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ‘हौस माझी पुरवा’ नाटक पहिल्यांदा नाट्यगृहात आलं. या नाटकाचे दिग्दर्शक संतोष पवार, निर्माते अजय राजाराम विचारे, अभिनेता अंशुमन विचारे, प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी आणि हर्षदा बामणे यांनी उत्तम अभिनय केल्याने हे नाटक कमी कालावधीत अधिक लोकांच्या पसंतीला उतरले आहे. नाटकाच्या निर्मात्याने हौस माझी पुरवा नाटक अनेक विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात दाखवले आहे. कारण मुलांना हे नाटक समजावं आणि नाटक काय आहे ते कळावं इतकाच त्याचा हेतू होता. सुंदरा मनात भरली हे नाटक सुध्दा संतोष पवार यांचं नुकतचं थिअटरमध्ये आलं आहे. त्या नाटकातील विनोद सुध्दा अधिक कॉमेडी असून त्यामध्ये विकास समुद्रे, संतोष पवार, स्मृती बडदे, प्रशांत शेटे, रामदास मुंजाळ, ऋषिकेश शिंदे इत्यादी कलाकार आहेत.

हौस माझी पुरवा नाटक मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहात होतं. तिथं नाट्यरसिक अधिक आलं होतं. त्याचबरोबर त्यांनी प्रेक्षकांना नाटक अधिक आवडल्याने रसिक कलाकारांना भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रूममध्ये आला होता. अनेक रसिक येत होते आणि फोटो काढून जात होते. परंतु एक दृष्टीहीन मुलगी रूजलं तिथं तिच्या आईसोबत आली. संतोष पवारांनी फोटो काढला आणि नाव विचारलं त्यानंतर त्यांनी दिव्यांग मुलीला शब्द दिला की, यांच्या पुढं तुला कधीही नाटक पाहावसं वाटलं की माझं जिथं नाटक असेल तिथं येऊन मला भेटायचं तुला माझ्याकडून एक पाहुणी म्हणून नाटक दाखवणार…एव्हढं बोलल्यानंतर त्या मुलीला आणि तिच्या आईला प्रचंड आनंद झाला. कोरोनानंतर पहिलं नाटक पाहिला आलेल्या रूजलला आणि तिच्या चेह-यावरील आनंद पाहून उपस्थित वर्ग अधिक खूष झाला.

“एक वेडसर…” म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले…

PHOTO | सर्वांगावर फुलाचा साज, उर्फीचा अनोखा अंदाज, रंगबाज उर्फीच्या अदांनी पुन्हा नेटकरी घायाळ!

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.