मुंबई – मराठी (marathi) अभिनेत्रींना रंजनाचे (actress ranjana) अनेक चाहते मुंबईच्या (mumbai) नगरीत आजही पाहायला मिळतात. 1960 च्या काळात रंजनाच्या करिअरला सुरूवात मुंबईत, मुळची मुंबईची असल्याने मायानगरी रंजनाला नवीन नव्हती. परंतु लोक काम करणारी नवीन होती. अनेक चित्रपटात चांगल्या भूमिका केल्याने मराठी चित्रपट क्षेत्रात चांगलं नाव कमावलं आणि पैसाही कमावला. रंजनाचं नाव रंजना गोवर्धन देशमुख असं आहे. सिनेमा क्षेत्रात करिअर करायचं असल्याने त्यांनी लहान असल्यापासून प्रयत्न केले. कमी कालावधीत त्यांना अधिक पसंती मिळाली असं अनेकजण म्हणतात. परंतु त्यांनी मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा केला असं म्हणायला हरकत नाही असं वाटतंय. रंजनाने चंदनाची चोळी आणि अंग अंग जाळी या चित्रपटातून 1975 आपल्या करिअरला सुरूवात केली. रंजनाच्या आईचं नाव वात्सल्या होतं त्यादेखील सुप्रसिध्द अभिनेत्री होत्या. त्यामुळे रंजनाला लहान असल्यापासून अभिनयाचे धडे घरातून मिळत गेले. त्यांच्या बालवयात त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
लोकप्रिय चित्रपट
झुंज या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला रंजना आणि रवींद्र महाजनी ही नवीन हीट जोडी दिली. झुंजच्या यशानंतर, त्यांनी दुनिया करी सलाम (1979), हिच खरी दौलत (1980), देवघर (1981), लक्ष्मीची पावले (1982), कशाला उद्याची बात (1983) आणि मुंबईचा फौजदार (1984) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी दोघांची मराठी रसिकांच्या मनावर अधिक राज्य केले. आजही त्यांचे चित्रपट मराठी वाहिनीवरती असल्यावर त्यांच्या प्रेक्षकवर्ग एक टक पाहत असतो. त्याकाळात दोघांची लोकप्रियता देखील तशीच होती.
प्रत्येक भूमिकेला रंजनाने न्याय देण्याचा प्रयत्न केला
रंजनाने विविध पात्रे साकारून स्वतःला आव्हान दिले आणि म्हणूनच तिच्या प्रत्येक चित्रपटात तिची वेगळी भूमिका पाहायला मिळत होती. काहींमध्ये, तिने लहान-शहर किंवा अडाणी मुलीची भूमिका केली; इतरांमध्ये, तिने उच्च शिक्षित स्त्रीची भूमिका केली. तिने तिच्या प्रत्येक पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. रंजना प्रत्येक चित्रपटाद्वारे लोकप्रियतेची नवीन उंची गाठत असताना, अचानक नशिबाने तिच्यासाठी वेगळी योजना आखली. झंजार (1987) च्या चित्रीकरणादरम्यान तिला अपघात झाला. तेव्हा 32 व्या वर्षी तिची भरभराट होत असलेली कारकीर्द अचानक संपुष्टात आली. अपघातानंतर तिला व्हीलचेअरवर बसवण्यात आले. 13 वर्षे व्हीलचेअरवर घालवल्यानंतर रंजना यांचे 3 मार्च 2000 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.