नवी मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, महामानव कोण साकारणार?

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची गौरव गाथा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही नवी मालिका सुरु होत आहे. अभिनेता सागर देशमुख  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. 15 एप्रिलपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वा ही मालिका पाहता येईल. भारताच्या […]

नवी मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, महामानव कोण साकारणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची गौरव गाथा छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही नवी मालिका सुरु होत आहे. अभिनेता सागर देशमुख  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. 15 एप्रिलपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. सोमवार ते शनिवार दररोज रात्री 9 वा ही मालिका पाहता येईल.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान  ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरु होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून पुन्हा उलगडलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण आणि राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या भव्यदिव्य मालिकेविषयी म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महामानवाचं हे महान कार्य मालिकेतून पोहोचवण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे”.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे.  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही नवी मालिका 15 एप्रिलपासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.