वकील बदल नाहीतर… दीपिका पदुकोणच्या मॅनेजरला NCBच्या अधिकाऱ्यांची धमकी?
करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे. | Drugs case Karishma Prakash
मुंबई: बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ‘एनसीबी’च्या (NCB) रडारवर असलेली करिष्मा प्रकाश हिने आपल्यावर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप केला होता. मी आपला वकील बदलावा. अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू, असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले होते. (NCB refutes Deepika Padukone manager Karishma Prakash allegations against it)
मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला आहे. एनसीबीने यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन माहिती दिली. करिष्माविरोधात कठोर कलम लावण्याचे पहिल्यापासून ठरले होते, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
करिष्मा प्रकाश ही अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी करिष्मा प्रकाश हिच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीला सामोरे जावे लागले होते.
करिष्मा प्रकाशवर कोणते आरोप?
एनसीबीने करिष्मा प्रकाश हिच्यावर एनडीपीएस कायद्यातील कलम 27-अ हे कठोर कलमही लावले होते. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पैसा पुरवणे आणि यातील गुन्हेगारांना आश्रय देणे, याबद्दल हे कलम असून, त्याअंतर्गत दोषीला 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ‘एनसीबी’ने करिष्माला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासही तीव्र विरोध दर्शवला आहे.
मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाला अटक
अमलीपदार्थ विरोधी कक्षाने (NCB) शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला अटक केली. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटासह (Shadab Batata) अन्य एकाला अटक करून, 2 कोटी पेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज, एक फॉर्च्युनर, एक i20, आणि एक बलोनो अशा 3 कार जप्त केल्या आहेत. एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. (NCB arrests drug peddler Shadab Batata)
एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
संबंधित बातम्या:
बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?
Drug Case | दीपिका पदुकोण – मॅनेजर करिश्मा गोव्यात होत्या, सूत्रांची माहिती
दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबीच्या चौकशीला गैरहजर; घरात सापडला ड्रग्जचा साठा