‘तो’ ड्रेस घालणे काजोल हिला पडले महागात, नेटकऱ्यांनी झापलं, थेट…

| Updated on: Oct 30, 2023 | 6:22 PM

काजोल हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. काजोल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काजोल ही नेहमीच तिच्या विधानांमुळे जोरदार चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने मोठे भाष्य केले.

तो ड्रेस घालणे काजोल हिला पडले महागात, नेटकऱ्यांनी झापलं, थेट...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. काजोल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. काजोल हिला या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे जोरदार ट्रोल केले जातंय. काजोल हिचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. इतकेच नाही तर काजोल हिच्या या व्हिडीओची जोरदार खिल्ली उडवली जातंय. लोकांना काजोल हिचा हा ड्रेस अजिबातच आवडला नाहीये.

नुकताच एका कार्यक्रमात काजोल ही पोहचलीये. यावेळी काजोल ही फोटोंसाठी पोझ देताना दिसली. काजोल हिचा तोच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. काजोल हिने घातलेल्या ड्रेसमुळेच तिला ट्रोल केले जात आहे. या ड्रेसमध्ये काजोल हिचे पोट दिसत आहे. यामुळेच काजोल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

एकाने कमेंट करत लिहिले की, काजोल हिने तिच्या मुलीचा ड्रेस घातलाय. दुसऱ्याने लिहिले की, मला अजिबातच काजोल हिचा हा लूक आवडला नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, अगोदर स्वत: ला फिट कर आणि मग अशाप्रकारचे कपडे घाल. अजून एकाने कमेंट करत म्हटले की, अरे काहीतरी दिसत आहे, हिने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

एकाने लिहिले की, 49 व्या वयात असे कपडे कशाला घालावेत. काजोल ही सध्या तिच्या दो पत्ती या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाकडून काजोल हिला मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. मात्र, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाहीये. हा चित्रपट ओटीटीवरच धमाका करताना दिसले. दो पत्ती चित्रपटाकडे जोरदार प्रमोशन करताना काजोल ही दिसत आहे. आता हा चित्रपट काय कामगिरी करतो हे पाहण्यासारखे ठरेल.

काजोल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काजोल हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला. इतकेच नाही तर काजोल ही थेट पापाराझी यांच्यावर भडकताना देखील दिसली. नेहमीच पापाराझी हे काजोल हिच्या निशाण्यावर दिसतात. काजोल ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.