Sushant Singh | रियाचे सीए ईडीच्या रडारवर, उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब तपासणार
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ईडीने आपला मोर्चा आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या सीएकडे वळवला आहे (ED inquiry of Rhea Chakraborty CA).
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ईडीने आपला मोर्चा आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या सीएकडे वळवला आहे (ED inquiry of Rhea Chakraborty CA). ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मागील अनेक दिवसांपासून तपास करत आहे. आता रियाच्या उत्पन्न आणि खर्चाविषयी ईडी चौकशी करणार आहे. .याचविषयी रियाचे सीए रितेश मोदी यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात ईडीने अनेकांचे जबाब घेतले आहेत. रियाच्या कुटुंबातील सदस्यांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे.
सीए रितेश मोदी यांच्याकडून रिया चक्रवर्तीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे. यात उत्पन्न आणि खर्चाबद्दल सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. रियावर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी 15 कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहाराचे आरोप केले आहेत. त्याप्रकरणी ईडीने रियासह तिचे कुटुंबीय आणि सुशांतची बहिण मीतू सिंह, अभिनेत्री आणि सुशांतची बिजनेस मॅनेजर श्रुती मोदी, मित्र सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी केलीय.
या व्यतिरिक्त सीबीआय देखील सुशांत सिंहच्या मृत्यूची चौकशी करत आहे. या प्रकरणी अनेकांची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सीबीआयने सुशांत सिंह प्रकरणी शांत राहणेच पसंत केले आहे.
दुसरीकडे सुशांत प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी सुरु आहे. तेथे मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस आमनेसामने आहेत. या प्रकरणाची चौकशी कोण करणार यावरुन हा वाद आहे. रिया चक्रवर्तीने आपल्या याचिकेत हे प्रकरण मुंबई पोलिसांकडेच ठेवावे अशी मागणी केली आहे. दरम्यानच्या काळात हे प्रकरण केंद्र सरकारने सीबीआयकडे हस्तांतरीत केलंय. यावरही न्यायालय आपला निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
घराचा हप्ता सुशांत भरत असल्याचा आरोप, अभिनेत्री अंकिता लोखंडेने घराची आणि बँकेची कागदपत्रे दाखवली
‘सुशांत सिंह प्रकरणी खरं जगाला जाणून घ्यायचंय’, बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी
ED inquiry of Rhea Chakraborty CA