Marathi Movie : ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मिळणार हास्याची मेजवानी

26 फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (‘Email Female’ movie to hit the screens soon, will get a feast of laughter)

Marathi Movie :  ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मिळणार हास्याची मेजवानी
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 6:54 PM

मुंबई : सध्या जाहिरातींमधूनही कधी नवनवीन मराठी चेहरे आता दिसू लागले आहेत. अशाच वेगवेगळ्या जाहिरातींमधून घराघरांत पोहोचलेले दोन मराठी चेहेरे आता ‘इमेल फिमेल’ या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी आणि कांचन पगारे ही जाहिरात क्षेत्रातील दोन परिचित नावं आता ‘इमेल फिमेल’ चित्रपटात आपली कमाल दाखवत धमाल घडवणार आहेत. या दोघांचा जाहिरातीतला ‘शॉर्ट अँड स्वीट’ असा अंदाज या चित्रपटातून दिसणार आहे. 26 फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे.

‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे. शंतनू ही मध्यमवर्गीय व्यक्तिरेखा साकारत निखिल एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत तर आयुष्य म्हणजे ‘खाओ पिओ ऐश करो’ असं मानत पार्ट्या करत अय्याशी करणाऱ्या विकीची भूमिका कांचन साकारत आहे. परस्परविरोधी अशा या दोन्ही भूमिका असल्या तरी सरतेशेवटी या जोडगोळीचा अतरंगीपणा, त्यातून निर्माण झालेला पेच याची मनोरंजक पण तितकीच विचार करायला प्रवृत्त करणारी कथा म्हणजे ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट.

आज ‘सोशल राहणं’ ही काळाची गरज असली तरी व्यक्त होण्याच्या या माध्यमाच्या योग्य वापराचं भान ठेवणं ही तितकंच महत्त्वाच आहे. हे भान सुटलं तर कठीण प्रसंग निर्माण होऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

निखिल रत्नपारखी, कांचन पगारे यांच्यासोबत विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. येत्या 26 फेब्रुवारीला ‘इमेल फिमेल’ प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या 

Marathi Movie : ‘हिरकणी’नंतर सोनाली साकारणार ‘महाराणी ताराबाई’, उलगडणार इतिहासाचं आणखी एक पान

Marathi Movie : पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या ‘लव्ह स्टोरी’चं गुपित अखेर उलगडलं!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.