Asha Bhosale: ‘स्वरा’चीच नाही तर ‘स्वादा’ ची सम्राज्ञी, आशा भोसले हॉटेल इंडस्ट्रीतून कमावतात ‘इतके’ टक्के नफा
सुरेख गायना सोबतच आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय जबरदस्त आहे. त्यांची दुबई आणि कुवेतमध्ये आशा नावाची रेस्टॉरंट्स आहेत, जिथे पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अबुधाबी, दोहा, बहरीन येथे रेस्टॉरंट्स आहेत.
बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale)आपल्या जादुई स्वरासाठी ओळखल्या जातात. आज त्या आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या जादूई आवाजाने अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवले. आशा भोसले यांचे वर्णन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी आणि यशस्वी गायिका(singer) म्हणून केले जाते. गेल्या आठ दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांच्या गायनाच्या ओळखीसोबतच्या आशा भोसले यांना कुकिंगची(Cooking)खूपही आवड आहे. मी आयुष्यात गायिका झाली नसती तर नक्कीच चांगलीच शेफ झाली असती. लोकांना चांगले खायला घातले असते. असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
22 भाषांमध्ये 11,000 हून अधिक गाणी गायली
आशा भोसले यांचा जन्म 1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगली या छोट्याशा गावात झाला. आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षी गाणे सुरू केले होते. 1943 साली वयाच्या 10 व्या वर्षी ‘माझा बाळा’ या मराठी चित्रपटात ‘चला चला नव बाळा…’ हे पहिले गाणे गायले अन तिथूच गायनाचा प्रवास सुरु झाला. आशा ताईंनी 1948 साली हंसराज बहलच्या चुनरिया या चित्रपटातील ‘सावन आया’ बॉलीवूडमध्ये पहिले गाणे गायले होते. 1997 मध्ये,त्यांनी उस्ताद अली अकबर खान यांच्या विशेष अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले. आशा ताईंना फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आतापर्यंत 7 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आशा भोसले यांनी ‘माय’ चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या कामगिरीचे कौतुकही झाले. आतापर्यंत 22 भाषांमध्ये 11000 हून अधिक गाणी गाऊन आशा ताईंनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.
शेफलाही दिले 6 महिने प्रशिक्षण
सुरेख गायना सोबतच आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय जबरदस्त आहे. त्यांची दुबई आणि कुवेतमध्ये आशाझ नावाची रेस्टॉरंट्स आहेत, जिथे पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अबुधाबी, दोहा, बहरीन येथे रेस्टॉरंट्स आहेत. रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ व सजावटीमध्ये आशा ताई ही एक ताकद आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमधील शेफला सुमारे 6 महिने प्रशिक्षण दिले आहे.