बंद पडणाऱ्या ‘सावित्रीजोती’साठी पुढे सरसावले ऊर्जामंत्री, मालिकेला अनुदान देण्याची मागणी!

सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'सावित्रीजोती' ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये, अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

बंद पडणाऱ्या 'सावित्रीजोती'साठी पुढे सरसावले ऊर्जामंत्री, मालिकेला अनुदान देण्याची मागणी!
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 6:44 PM

मुंबई : स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी समाजाची अवहेलना स्वीकारून काम करणाऱ्या फुले दांपत्याच्या कर्तृत्वावर आधारलेली मालिका ‘सावित्रीजोती’ (Savitrijoti) आधुनिक काळात प्राईम टाईमच्या स्पर्धेत मात्र पिछाडीवर पडत गेली. मालिकेला टीआरपी मिळत नसल्याने अखेर ती आटोपती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता या मालिकेसाठी खुद्द ऊर्जा मंत्री पुढे सरसावले आहेत (Energy Minister Dr. Nitin Raut comes forward for Marathi serial Savitrijoti).

सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सावित्रीजोती’ ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये, अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. तसेच, या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना या विषयावर लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

जनतेने मालिका आवर्जून पाहावी : डॉ. नितीन राऊत

‘टीआरपी न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या सोनी वाहिनीने घेतला असल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्र म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टिव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागतेय, हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. ही मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहचणार? त्यामुळे जनतेनी ही मालिका आवर्जून पहावी,’ असे आवाहनही डॉ. नितीन राऊत त्यांनी केले आहे.

तसेच, केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर, ‘सावित्रीजोती’ ही मालिका चालू ठेवण्याची विनंतीही त्यांनी सोनी मराठी वाहिनी आणि मालिकेच्या निर्मात्यांनाही केली आहे. ‘चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याबाबत  विचार करावा,’ अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे (Energy Minister Dr. Nitin Raut comes forward for Marathi serial ‘Savitrijoti’).

(Energy Minister Dr. Nitin Raut comes forward for Marathi serial Savitrijoti)

लॉकडाऊनचा फटका!

यंदाच्या वर्षी 6 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात झाली होती. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे बाकी मालिकांप्रमाणेच या मालिकेचे चित्रीकरणही ठप्प झाले होते. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर या मालिकेचे चित्रीकरण पूर्ववत सुरू झाले होते. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावित्रीजोती’ (Savitrijoti) या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी ‘महात्मा फुले’ यांची तर, अभिनेत्री अश्विनी कासार यांनी ‘सावित्रीबाई फुले’ यांची भूमिका साकारली आहेत.

नवऱ्याची लफडी, सासू-सुनांची भांडणं हेच आवडतं का?

केवळ टीआरपी नसल्याने मालिका बंद होत असल्याचे कळताच दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर देखील संतप्त झाले आहेत. त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपला राग व्यक्त केला आहे. ‘प्रेक्षकांना केवळ नवऱ्याचे लफडे, घरातल्या कुरघोडी यातच रस आहे की काय? अशी अभिरुची असेल तर नवे विषय आणण्यास निर्माते धजावणार नाहीत. विशेष म्हणजे महिला प्रेक्षक वर्गाकडून सावित्रीबाईंची मालिका पहिली न जाणे हे दुर्दैवी आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

(Energy Minister Dr. Nitin Raut comes forward for Marathi serial Savitrijoti)

हेही वाचा : 

Annaatthe | ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या सेटवर आठजण कोरोना पॉझिटिव्ह, रजनीकांत क्वारंटाइन होणार! 

Video : नेहानं पुन्हा एकदा केली प्रेग्नेंसीची फेक अ‍ॅक्टिंग, सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.