सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर रिलीज, या तारखेला रिलीज होणार चित्रपट
गेल्या अनेक महिन्यांपासून 'द आर्चीज'च्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पहात होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या 'द आर्चीज' या डेब्यू चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाद्वारे हे तीन स्टार किड्स एकत्र डेब्यू करणार आहेत.
मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : नामवंत दिग्दर्शक झोया अख्तर हिचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. पण, या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. अखेर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून अनेक स्टार किड्स एकत्र डेब्यू करणार आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याची लाडकी लेक सुहाना खान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे तिघेही ‘द आर्चिज’मधून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. त्या तिघांचाही हा पदार्पणातील चित्रपट असून अनेकांच्या नजरा या चित्रपटावर खिळल्या आहे.
अनेक चाहते सुहाना आणि खुशीच्या डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. ट्रेलरआधीच निर्मात्यांनी चित्रपटाची दोन गाणी रिलीज केली होती. ज्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर आज, ९ नोव्हेंबरला ‘द आर्चीज’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
View this post on Instagram
कधी होणार चित्रपट रिलीज ?
नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिली होणाऱ्या ‘द आर्चीज’ चित्रपटाची कथा काही मित्रांची आहे. त्यामध्ये प्रेम, रोमान्स आणि ड्रामा आहे. खुशी कपूर आणि सुहाना कपूर यांना बेस्ट फ्रेंड दाखवण्यात आले आहे. मात्र त्या दोघी एकाच मुलाच्या प्रेमात पडतात. ड्रामाबद्दल सांगायचे झाले तर सुहाना ही एका श्रीमंत वडिलांची लेक दाखवण्यात आली आहे. जे एक जंगल तोडून त्यावर मोठा , नवा प्रोजेक्ट सुरू करणार असतात. अखेर सर्वजण मिळून ते जंगल वाचवण्यासाठी कसा लढा देतात, तेही या चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. सुहानाही वडिलांच्याविरोधात जाऊन मित्रांची साथ देते. पुढील महिन्यात, अर्थात 7 डिसेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.