उर्फी जावेद कॅमेऱ्यासमोर टॉपलेस, नव्या कारनाम्याने जाळ अन् धूर संगाटच; व्हिडीओ तूफान व्हायरल
Urfi Javed Video : तिच्या अतरंगी स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद आता नव्या अवतारात दिसली आहे. तिचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
मुंबई : तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद (Uorfi Javed) आता नव्या अवतारात आली आहे. उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे लोक खूप ट्रोल (trolling) करतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सोशल मीडियावर (social mviral videoedia) ती विचित्र आउटफिट्समध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता तिचा आणखी एक असाच नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
उर्फीने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा अतरंगी अंदाजात दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती टॉपलेस दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, तिचे शरीर झाकण्यासाठी, तिने मोत्यांनी बनवलेला एक लांब हार वापरला आहे, जो तिने तिच्या केसांना बांधला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत उर्फीने तिचे शरीर मोत्यांच्या हाराने झाकलेले दिसत आहे, पण नंतर तिने स्वत:च्याच हातातील कात्रीने तो हार कापल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. तो हार कापल्यावर सगळे मोती जमीनीवर घरंगळत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने हा लूक maison_kimhekim पासून प्रेरित असल्याचेही नमूद केले आहे. हा एक कोरियन फॅशन ब्रँड आहे.
फॅन्सची काय रिॲक्शन ?
दरवेळेप्रमाणे उर्फी जावेदचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोकांनी तिला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, “हे काय होते?” तर दुसऱ्या व्यक्तीने ‘मेंटल हो गई है ये’ अशी कमेंट केली. ‘हे काय कपडे आहेत का ? ‘ असा सवालही काही लोकांनी कॉमेंटमध्ये विचारला आहे.
उर्फी जावेदच्या या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. असा ड्रेस घातल्याने लोक तिला ट्रोल करत आहेत. मात्र, या सगळ्याबाबत उर्फीची काहीच हरकत नाही. उर्फी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे 41 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
View this post on Instagram
उर्फी जावेद ही कायम चर्चेत असते. अगदी कमी कालावधीमध्ये उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक खास ओळख मिळवली आहे. उर्फी ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात सापडते. काही लोक तिला ट्रोल करतात, पण असे बरेच लोक आहेत, जे उर्फी जावेद हिचे कौतुकही करत असतात.