जेवण द्यायला नकार दिल्याने शिवीगाळ, शर्टही फाडलं, ढसाढसा रडू लागले; नाना पाटेकर यांचा हा किस्सा माहीत आहे काय?
नाना पाटेकर आणि वाद हा नेहमी चर्चेचा विषय असतो. सिनेमाच्या सेटवर त्यांचे कुणाशी तरी वाद होतातच. त्यामुळे नाना सेटवर आल्यावर त्यांना सर्वच जण दचकून असतात. नाना कधी काय करेल याचा नेम नसल्याने सर्वजण त्यांच्यापासून दूर राहतात. त्यांच्यासोबत झालेल्या एका वादाचा असाच किस्सा विधु विनोद चोप्रा यांनी शेअर केला आहे. हा किस्सा परिंदाच्या सेटवरचा आहे.
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याबाबतचे अनेक किस्से नेहमी व्हायरल होत असतात. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबतची त्यांची केमिस्ट्री आणि वाद हे नेहमीच चर्चेत असतात. प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकर यांच्या संबंधितील एक किस्सा सांगितला आहे. परिंदा या सिनेमाच्यावेळचा हा किस्सा आहे. सेटवरच नाना पाटेकर यांच्यासोबत कसं वाजलं होतं आणि नाना कसे रडू लागले होते, याची माहिती विधु विनोद चोप्राने दिली आहे.
काय घडलं होतं?
परिंदाच्या सेटवर नाना पाटेकरने जेवण मागितलं होतं. त्यांना प्रोडक्शनने जेवण देण्यास नकार दिला. कारण परिंदा कमी बजेटचा सिनेमा होता. सर्वांना घरूनच जेवण घेऊन यायला सांगण्यात आलं होतं, असं विधु विनोद चोप्रा म्हणाले. नाना यांनी सेटवर जेवण मागितलं होतं, त्याचं विधु विनोद चोप्रा यांना आश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी तुम्ही घरून जेवण आणलं नाही का? असा नाना यांना सवाल केला. त्यावरून नाना आणि विधु यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करू लागले. विधु विनोद चोप्रा यांनी तर नाना पाटेकर यांचे शर्ट फाडलं होतं. विशेष म्हणजे पुढच्या सीनमध्ये नाना पाटेकर यांना हे शर्ट घालायचं होतं. यावरून या दोघांमध्ये किती मोठा वाद झाला होता हे दिसून येतं.
रडतच सीन दिला
हा झगडा सुरू असतानाच सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान यांनी शॉट तयार असल्याचं सांगितलं. त्यांनी टेक द्यायलाही सांगितलं. त्यानंतर विधु विनोद चोप्रा सीन शूट करण्यासाठी खुर्चीवर बसले होते. नाना पाटेकर यांचं शर्ट फाटलेलं होतं. त्यामुळे बनियानवरच ते शुटींग करत होते. या सीनमध्ये नाना पाटेकर यांना रडायचं होतं. सीनच्या डिमांडनुसार नाना रडलेही. पण ते अश्रू सिनेमातील सीनचे नव्हते. ते खरे होते. विधु यांच्यासोबत जे भांडण झालं होतं, त्यामुळे नाना पाटेकर ढसाढसा रडले होते. त्यांचं रडणं सुरू असतानाच त्यांनी हा सीन दिला होता, असं विधु यांनी सांगितलं.
नानांची कमाल
1989मध्ये परिंदा हा सिनेमा आला. जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित आदी बडे स्टार या सिनेमात होते. या सिनेमात नाना पाटेकर यांनी व्हिलनची भूमिका केली. ही भूमिका आधी नसिरुद्दीन शाह करणार होते. पण त्यांनी सिनेमा सोडला आणि ही भूमिका नाना पाटेकर यांच्या वाट्याला आली. विशेष म्हणजे जॅकीची भूमिका नाना करणार होते. पण अनिल कपूर यांनी नानांचा पत्ता कट केला. या रोलमुळे नाना सुपरस्टार होतील, अशी भीती वाटल्याने अनिल कपूरने नाना पाटेकर यांचा पत्ता कट केला आणि ही भूमिका जॅकीला मिळाली. पण नसिरुद्दीन शाह यांनी सिनेमा सोडल्यानंतर नाना पाटेकर यांची या सिनेमात एन्ट्री झाली. नानाची या सिनेमातील भूमिका प्रचंड गाजली. नानांना खलनायकाचा पुरस्कारही मिळाला. तर सिनेमाने त्यावेळी 9 कोटींची कमाई केली होती.