Esha Deol Bharat Takhtani : ईशा देओलच घटस्फोटाला कारणीभूत?, नवऱ्याचे गंभीर आरोप; भरत म्हणाला, ईशा मला सतत…

अभिनेत्री ईशा देओल ही वैयक्तिक आयुष्यामुळे फोकसमध्ये होती. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी हे दोघेही वेगळे होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता त्या दोघांनीही एक अधिकृत स्टेटमेंट देऊन ही बातमी कन्फर्म केली. भरतचे अफेअर हेच संसार तुटण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा होती. आता भरत तख्तानी याचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे.

Esha Deol Bharat Takhtani : ईशा देओलच घटस्फोटाला कारणीभूत?, नवऱ्याचे गंभीर आरोप; भरत म्हणाला, ईशा मला सतत...
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:11 PM

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामालिनी यांची लेक आणि अभिनेत्री ईशा देओल ही वैयक्तिक आयुष्यामुळे फोकसमध्ये होती. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी हे दोघेही वेगळे होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र आता त्या दोघांनीही एक अधिकृत स्टेटमेंट देऊन ही बातमी कन्फर्म केली. त्यांच्या घटस्फोटाचे कारण काय, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. तरी भरतचे अफेअर हेच संसार तुटण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा होती. आता भरत तख्तानी याचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने ईशा देओलच्या वागण्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

या घटस्फोटामागे भरत तख्तानी हे कारण असल्याचे मानले जात होते. त्याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून अभिनेत्रीने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी अशीही बातमी समोर आली होती की, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा देओल आणि भरत यांच्यात दुरावा वाढू लागला होता. पण आता भरतची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने ईशा देओल खूप पझेसिव्ह असल्याचे सांगितले होते.

ईशामध्ये खूप ईगो आहे

हे सुद्धा वाचा

खरंतर भरतने एका जुना मुलाखतीत दावा केला होता की त्याची पत्नी ईशा देओल त्याला खूप त्रास द्यायची. भांडणांबद्दल जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला ‘ मला वाद घालायला आवडत नाही, पण ईशाला त्याच त्याच गोष्टी पुन्हा उगाळायची सवय आहे. ती प्रत्येक मुद्दा पकडून ठेवते आणि तिच्यात खूप ईगो आहे. पण मी असा नाहीये,’ असं भरतने सांगितलं होतं.

‘ ईशा माझ्याबाबतीत खूप पझेसिव्ह आहे, ती मला नेहमी पकडून ठेवते. मी माझ्या जुन्या मित्रांना देखील भेटू शकत नाही, कारण ती नाराज होते. भविष्यात ईशा (आमच्या) मुलांबद्दलही पझेसिव्ह होईल… ती तर नर्सला देखील बाळाला हात लावू देणार नाही ‘ अशा शब्दात भरतने ईशाच्या वागणुकीबद्दल सांगितले होते. यामुळे त्यांच्या घटस्फोटासाठी भरतप्रमाणेच ईशाचाही हात नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

रेडिट युजरने केला होता विभक्त झाल्याचा दावा

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बरीच गॉसिप सुरू होतं. त्याची सुरुवात Reddit वर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे झाली. ईशा- भरतमध्ये सर्व काही आलबेल नाही, असं या पोस्टमध्ये म्हटले होते. दोघेही वेगळे झाले, अशी अटकळही बांधण्यात आली. गेल्या वर्षी फेस्टिव्ह सीझनमध्ये ईशा देओल फक्त तिची आई हेमा मालिनीसोबत दिसली होती. आमिर खानची मुलगी आयरा हिच्या रिसेप्शनलाही ईशा तिच्या आईसोबत आली होती. तसेच हेमामालिनी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठीही भरत तख्तानी आला नव्हता. त्यावरूनच ईशा-भरतच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. अखेर गेल्या आठवड्यात ईशा-भरतने अधिकृत स्टेटमेंट जारी करत वेगळं होत असल्याचे जाहीर केले होते.

ईशा-भरतचं लग्न

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. या लग्नात देओल कुटुंबीय खूपच आनंदी होते. लेकीची पाठवणी करताना धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ईशा आणि भरत यांना राध्या आणि मिराया नावाच्या दोन मुली आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.