Hrithik Roshan : वयाच्या 48 व्या वर्षीही हृतिक रोशनचा फिटनेस लाजवाब ; जाणून अभिनेत्याच्या फिटनेसचे रहस्य
हृतिकच्या अभिनयासोबतच फिटनेसच्या टिप्स चाहत्यांच्या सोबत शेअर करत असतो. वयाच्या 48 व्या वर्षीही त्याने आपल्या फिटनेसने सर्वांना मागे टाकले आहे.
बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या डान्स, अभिनया सोबतच हृतिक रोशन (Hrithik Roshan)फिटनेसाठी ओळखला जातो. हृतिक स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आजही तगडी मेहनत करतो. वयाच्या 48 व्या वर्षीही त्याने आपल्या फिटनेसने सर्वांना मागे टाकले आहे. अनेकदा तो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांशी त्याच्या फिटनेस टिप्स शेअर करत असतो. हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर प्रत्येक तो चित्रपटात त्यांच्या शरीरावर खूप मेहनत घेतो. अभिनयासोबतच फिटनेस ट्रेनर त्याच्या आहार आणि वर्कआउटवर खूप लक्ष देतो.
आहाराला देतो प्राधान्य
फिटनेससाठी तो आहाराकडे खूप लक्ष देतो आणि जेव्हा तो बाहेर जातो. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा शेफलासोबत घेऊन जात असतो. त्याच्या आहारानुसार जेवण बनवताना दिसतो तसेच सर्वच बॉलीवूड पार्ट्यांपासून दूर राहतो .
हृतिक रोशन दररोज व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला एक ते दीड तास वॉर्म अप करतो. एखाद्या पूर्ण वर्कआउट सेशन इतका वेळ तोच अभिनेता त्याच्या शरीराला वॉर्मअप करण्यात घालवतो.
वॉर्मअप आणि वर्कआउट
हे वॉर्म-अप केल्याने, दुखापत होण्याची शक्यता खूपच कमी होते आणि गतिशीलता देखील वाढते. सुमारे अडीच तास वॉर्मअप आणि वर्कआउट केल्यानंतर तो स्ट्रेचिंग करतो. संध्याकाळी वेट ट्रेनिंग दरम्यान तो आपल्या शरीराच्या दोन भागांवर लक्ष केंद्रित करतो.
हृतिक रोशनचा आहार त्याच्या चित्रपटातील पात्रानुसार बदलतो. या स्नायूंच्या बळकटीसाठी तो प्रथिने आणि कार्बचे आहार घेण्यास प्राधान्य देतो. हृतिक रोशन नाश्त्यासाठी दोन मल्टीग्रेन टोस्ट आणि 8 अंडी असलेले अवोकाडो घेतो. दुपारच्या जेवणात तो ब्राऊन राइस, चिकन आणि सॅलड खातो.
त्याचबरोबर स्नॅक्समध्ये, तो प्री-वर्कआउट आणि पोस्ट-वर्कआउट जेवण म्हणून नट्स आणि प्रोटीन शेक घेतो. तो रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचा समावेश करत नाही. तो अंड्याचा पांढरा, चिकन, सॅलड, मटण आणि मासे खातो.