Idian Idol 12 | अभिजीत सावंतनंतर मियांग चँगची ‘इंडियन आयडॉल’वर प्रतिक्रिया, कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना म्हणाला…

| Updated on: May 29, 2021 | 4:21 PM

अमित कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर या प्रकरणात अनेक सेलेब्स पुढे आले. या कार्यक्रमाचा माही स्पर्धक आणि विजेता अभिजीत सावंत यांनी यापूर्वी निर्मात्यांविरूद्ध बोलताना म्हटले होते की, ते स्पर्धकांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या शोकांतिकेबद्दल अधिक बोलतात.

Idian Idol 12 | अभिजीत सावंतनंतर मियांग चँगची ‘इंडियन आयडॉल’वर प्रतिक्रिया, कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना म्हणाला...
मियांग चँग
Follow us on

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’चा (Indian Idol 12) किशोर कुमार विशेष भाग पार पडल्यापासून हा शो खूप चर्चेत आला आहे. या भागात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) यांनी हजेरी लावली होती. या शोचा एक भाग झाल्यानंतर अमित यांनी या कार्यक्रमावर टीका करतना सांगितले की, तो शो मला अजिबात आवडला नाही आणि केवळ निर्मात्यांनी सर्वांचे कौतुक करण्यास सांगितले, म्हणून मी हे काम केले.’ अमित कुमारच्या या वक्तव्यानंतर बरेच वादंग निर्माण झाले होते (Ex Contestant of Indian idol meiyang chang reaction on Indian Idol 12 Controversy).

अमित कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर या प्रकरणात अनेक सेलेब्स पुढे आले. या कार्यक्रमाचा माही स्पर्धक आणि विजेता अभिजीत सावंत यांनी यापूर्वी निर्मात्यांविरूद्ध बोलताना म्हटले होते की, ते स्पर्धकांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या शोकांतिकेबद्दल अधिक बोलतात.

आमच्यावेळी ग्लॅमर नव्हतं!

आता या प्रकरणावर मियांग चँग (meiyang chang) याने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: मियांगने देखील इंडियन आयडॉलच्या 5व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. मियांगने सांगितले की, तो बर्‍याच दिवसांपासून शोच्या टीमशी संपर्कात नव्हता, म्हणूनच त्याला या ट्रोलिंगबद्दल काही माहिती नव्हती. मियांग याबद्दल बोलताना म्हणाला की, सध्या तो आपल्या मित्रांसमवेत वेळ घालवत आहे.

मियांग म्हणाला, ‘मी ऐकलं आहे की या पर्वातील गायक बरेच प्रशिक्षित आहेत. हे गायक बर्‍यापैकी शक्तिशाली आहेत. आमचे पर्व अगदी सरळ आणि साधे होता. त्यावेळी आमच्यापैकी कोणीही या ग्लॅमरस जगातात परिचित नव्हते. तसेच, सोशल मीडियावर कोणालाही एक्सपोजर दिला गेला नव्हता. त्यावेळेस काम अत्यंत निर्दोषतेने केले जात होते (Ex Contestant of Indian idol meiyang chang reaction on Indian Idol 12 Controversy).

मियांग पुढे म्हणाला, ‘असो, हे प्रत्येकालाच माहित आहे की रिअॅलिटी शोमध्ये थोडं नाटक असतं. आमच्या काळात सर्व काही अगदी सोपं होतं. कारण त्यावेळी काहीच ग्लॅमरस नव्हतं.’

अभिजित सावंत काय म्हणाला?

यापूर्वी या कार्यक्रमाविषयी बोलताना अभिजीत म्हणाला होता की, आजकाल निर्माते स्पर्धकांची प्रतिभा पाहत नाहीत, पण ते शूज पॉलिश करू शकतात का?, ते गरीब आहेत ते पाहतात.’

अभिजीत पुढे म्हणाला, ‘प्रेक्षकांनी प्रादेशिक रिअ‍ॅलिटी शो पाहायला हवेत, ज्यात स्पर्धकांच्या पार्श्वभूमीबद्दल काही माहित नसते, आणि त्यांचे लक्ष फक्त गाण्यावर असते. परंतु, हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये केवळ स्पर्धकांची दु:खद कथा दाखवली जाते.’

(Ex Contestant of Indian idol meiyang chang reaction on Indian Idol 12 Controversy)

हेही वाचा :

Photo : सुपरकूल हैं हम… खतरों के खिलाडी सीजन 11 च्या टीमची केपटाऊनमध्ये धमाल, कूल फोटो शेअर

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!