‘मेड इन हेवन’, दिल चाहता है’ च्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल चाहता है, चक दे इंडिया,मर्दानी यांसारखे चित्रपट आणि 'मेड इन हेवन' या वेबसीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे प्रसिद्ध अभिनेता रियो कपाडिया यांचे निधन झाले आहे. गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'मेड इन हेवन', दिल चाहता है' च्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 5:05 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध वेबसीरिज ‘मेड इन हेवन’ मध्ये महत्वाची भूमिका निभावणारे, प्रसिद्ध अभिनेते रियो कपाडिया (Rio kapadia) यांचं निधन झालं आहे. एका गंभीर आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर अखेर गुरूवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर (bollywood) शोककळा पसरली आहे. उद्या 15 सप्टेंबर रोजी मुंबईतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘मेड इन हेवन’ वेबसीरिजमध्ये त्यांनी मृणाल ठाकूरच्या वडिलांची भूमिका निभावली होती. आपल्या लेकीला होणाऱ्या त्रासानंतर तिच्यापाठी खंबीरपणे उभे राहणारे, तिच्या प्रत्येक निर्णयात साथ देणारे एक प्रेमळ वडील त्यांनी यामध्ये रंगवले होते. त्यांच्या या भूमिकेचे बरेच कौतुकही झाले. तर त्यापूर्वीही रियो कपाडिया यांनी विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. आमिर खान, शाहरूख खान, अभिषेक बच्चन तसेच राणी मुखर्जी या कलाकांरासोबतही त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. महाभारत या प्रसिद्ध मालिकेतील त्यांची पांडू ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय ठरली होती. ‘हॅपी न्यू ईअर’, मर्दानी’, ‘प्रधानमंत्री’, ‘हम हैं राही कार के’, ‘श्री’, ‘एक अनहोनी’, ‘मुंबई मेरी जान’ तसेच’दिल चाहता है’ याशिवाय’चक दे इंडिया’ चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. रियो यांचे मित्र फैजल मलिक यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.