‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. या बाजारात चित्रपटातील कलाकारांच्या नावाने गाढवांचा लिलाव केला जातो. यंदा लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गाढवावर लाखोंची बोली लावण्यात आली.

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा सुरु होतो, जो पुढील काही दिवस चालतो. ज्यामध्ये दूरदूरवरून व्यापारी येतात.
औरंगजेबाच्या काळापासून भरलवला जातो बाजार
या बाजारात उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांतून गाढवे विक्री आणि खरेदीसाठी आणली जातात. या बाजाराची खासियत म्हणजे, या बाजारात चित्रपटातील कलाकारांच्या नावाने गाढवांचा लिलाव केला जातो.औरंगजेबाच्या काळापासून हा मेळा भरवला जात असून येथे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो.
- Famous donkey fair at Chitrakoot in Madhya Pradesh
फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या बाजाराची खास गोष्ट म्हणजे इथे बॉलिवूड स्टार्सच्या नावाने गाढवांची खरेदी-विक्री केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सलमान खानच्या नावाच्या गाढवाची ८० हजारांना विक्री झाली. मात्र, या वर्षी सलमान खानपेक्षाही लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गाढवाने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले. लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गाढवावर तब्बल १ लाख १५ हजारांची बोली लावण्यात आली.
- Famous donkey fair at Chitrakoot in Madhya Pradesh
सलमान, शाहरुखपेक्षा लॉरेन्सवर लाखोंची बोली
यंदाच्या जत्रेत सलमान खान आणि शाहरुख खान नावाच्या खेचरांची लॉरेन्स नावाच्या खेचरांपेक्षा स्वस्तात विक्री झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान 80 हजार रुपयांना, शाहरुख 85 हजार रुपयांना आणि लॉरेन्सची 1.25 लाख रुपयांना विक्री झाली आहे.
- Famous donkey fair at Chitrakoot in Madhya Pradesh
मंदाकिनी नदीच्या काठी भरतो बाजार
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. देशात अनेक अनोख्या परंपरा पाहायला मिळतात. ही एक परंपरा मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीच्या काठावर पाहायला मिळते.,अन्नकूट येथून मंदाकिनी नदीच्या काठावर ही जत्रा भरते जिथे हजारो गाढवे आणि खेचरांची खरेदी-विक्री केली जाते.मात्र लोकांच्या मते सोयी-सुविधां अभावी मुघल काळापासून चालत आलेली ही परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
- Famous donkey fair at Chitrakoot in Madhya Pradesh
कलाकारांच्या नावांनी गाढवांची विक्री का?
मंदाकिनी किनाऱ्यावर दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील पशुधन व्यापारी सहभागी होतात. त्याचबरोबर या जनावरांचे खरेदीदार देशभरातून येतात. येथे पोहोचलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, येथील गाढव चित्रपट कलाकारांच्या नावाने ओळखले जातात. बॉलीवूड कलाकारांची नावे दिल्याने गाढवांची विक्री वाढते, असे या बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे मत आहे.