Swapnil Shinde | बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे बनला ‘साईशा शिंदे’! सोशल मीडियाद्वारे केला खुलासा..

स्वप्निल शिंदेने नव्या वर्षात त्याचे नवे रुप आणि नवे अस्तित्त्व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आहे.

Swapnil Shinde | बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे बनला ‘साईशा शिंदे’! सोशल मीडियाद्वारे केला खुलासा..
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 1:51 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेने (Fashion Designer Swapnil Shinde) सोशल मीडियाद्वारे एक मोठी बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. स्वप्निल शिंदेने नव्या वर्षात त्याचे नवे रुप आणि नवे अस्तित्त्व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणले आहे. स्वप्निलने आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याचा खुलासा करत सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. स्वप्निल शिंदेने आता ‘साईशा शिंदे’ असे नामकरण केले आहे (Famous Fashion Designer Swapnil Shinde transformation as transwoman  Saisha Shinde).

डिझायनर स्वप्नील शिंदेनी स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नीलने त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. यासंदर्भात सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो आणि एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

जे अस्तित्व माझे नाही, ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते…

सोशल मीडियावरील या नवीन फोटोंमध्ये ‘सायशा’चा अर्थात स्वप्निल शिंदेचा नवा लूक पाहायला मिळतोय. या फोटोंसोबतच त्याने एक पोस्ट लिहीत आपण ‘ट्रान्सवुमन’ झाल्याबाबत खुलासा केला आहे. या भावूक पोस्टमध्ये तो लिहितो की, ‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले मला माझ्या वागण्यावरून त्रास देत होते, तेव्हा माझ्या मनावर खूप आघात झाले. जे अस्तित्व माझे नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखे होत होते. वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान, मी स्वतःचे सत्य स्वीकारण्याचे धाडस केले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे, असे सुरुवातीला मला वाटले. पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारले आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रान्सवुमन आहे’, असे सायशाने लिहिले आहे (Famous Fashion Designer Swapnil Shinde transformation as transwoman  Saisha Shinde).

याचबरोबर, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या’, या शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले. अखेर शस्त्रक्रियेचा आधार घेऊन स्वप्निलने ‘ट्रान्सवुमन’ होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडकरांचा पाठींबा

स्वप्निल शिंदेने आतापर्यंत अभिनेत्री करिना कपूर-खान, दीपिका पदुकोण, सनी लिओनी, कियारा अडवाणी, कतरिना कैफ यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. स्वप्निलच्या सोशल मीडिया पोस्टवर देखील अनेक कलाकारांनी कमेंट करत आपला पाठींबा दर्शवला आहे. स्वप्निलमधील या बदलाचे अर्थात ‘साईशा’चे अभिनेत्री सनी लिओनी, अदिती राव हैदरी, श्रृती हसन, सई ताम्हणकर यांनी स्वागत केले आहे.

(Famous Fashion Designer Swapnil Shinde transformation as transwoman  Saisha Shinde)

हेही वाचा :

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.