Waman Bhonsle | प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन
प्रसिद्ध चित्रपट संपादक वामन भोसले (Waman Bhonsle) यांचे निधन झाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट संपादक वामन भोसले (Waman Bhonsle) यांचे निधन झाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1969 मध्ये त्यांनी राज खोसला यांच्या ‘दो रास्ता’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. ‘मेरा गाव मेरा देश’, ‘इंतेकाम’, ‘इंकार’, ‘मौसम’, ‘आंधी’, ‘दोस्ती’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘सौदागर’ आणि ‘गुलाम’ इत्यादी हिंदी चित्रपट आणि अशाने अनेक सुपरहिट सीरियल त्यांनी संपादित केल्या आहेत. 2002 मध्ये त्यांनी कामातून निवृत्ती घेतली (Famous film editor Waman Bhonsle passed away).
वृद्धापकाळाने त्यांनी आज (सोमवारी) सकाळी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. ‘इन्कार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
Deeply Saddening news of one of the finest Film editor Shri Waman Bhonsle [Waman-Guru] passing away..Heartfelt condolence to family and friends.. RIP?? #IFTPC #SajidNadiadwala @JDMajethia @rtnjn @RameshTaurani @nrpachisia @Vijay_Galani @tsunami_singh #SureshAmin pic.twitter.com/hCDd3Y3ba2
— INDIAN FILM TV PRODUCERS COUNCIL (@IftpcM) April 26, 2021
वामन भोसलेंची ओळख
हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत संकलक म्हणून वामन भोसले यांच्या नावाचा गवगवा बराच काळ राहिला. गोव्यातील पांबुरपा या छोट्याशा गावात जन्म झालेले वामन भोसले पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. ‘बॉम्बे टॉकिज’ या चित्रपट निर्मिती संस्थेत 1952मध्ये त्यांनी संकलक डी. एन. पै यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘फिल्मिस्तान’मध्ये सहायक संकलक म्हणून ते काम करू लागेल. 1967 मध्ये राज खोसला यांनी आपल्या, राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या भूमिका असलेल्या ‘दो रास्ते’या चित्रपटाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 1978मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कार’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते (Famous film editor Waman Bhonsle passed away).
‘गुलाम’च्या त्या दृश्यामुळे झाले कौतुक
बॉलिवूड अभिनेता आमीर खान अभिनिती ‘गुलाम’ या चित्रपटात एक दृश्य आहे. समोरून रेल्वे येत असताना समोरील मार्कपर्यंत धावत जाण्याची पैज लागते. नायक अर्थात आमीर आव्हान स्वीकारतो आणि समोरून रेल्वे येत असताना तिच्या दिशेने धावत सुटतो आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच मार्कच्या पलीकडे स्वतःला झोकून देतो. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात रेल्वेशी संबंधित जे स्टंट दृश्य आहेत, त्यामध्ये हे सर्वोत्कृष्ट दृश्य मानले जाते. या दृश्याचे संकलन केले होते वामन भोसले यांनी. राज्य सरकारने 2019 ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता.
(Famous film editor Waman Bhonsle passed away)
हेही वाचा :
बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण…
Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?https://t.co/Im1D5Pxtsa#nishabhagat | #bhimrajkibeti | #marathisong | #lokgeet | #bhimgeet
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2021