‘जम्मू की धड़कन’, 7 लाख फॉलोअर्स… एक होती सिमरन; घरच्यांचे रडून रडून हाल

| Updated on: Dec 27, 2024 | 1:29 PM

प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंह यांचा गुरुग्राम येथे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.जम्मू-काश्मीरमधून आलेल्या सिमरन या रेडिओ मिर्चीसोबत काम करत होत्या. त्यांच्या मृत्यूने जम्मू-काश्मीरमध्ये शोक व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

‘जम्मू की धड़कन’, 7 लाख फॉलोअर्स... एक होती सिमरन; घरच्यांचे रडून रडून हाल
RJ Simran Singh suicide
Follow us on

जम्मू काश्मीरशी संबंध असलेली फेमस रेडिओ जॉकी आरजे सिमरन सिंग हिने काल आय़ुष्य संपवलं आहे. या प्रकरणाची आता पोलीस चौकशी करत आहेत. सिमरनने आयुष्य का संपवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अवघ्या 25 व्या वर्षी सिमरनने अत्यंत धक्कादायक पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिमरन टेन्शनमध्ये होती का? की तिच्या आत्महत्येमागे आणखी काही कारणं आहेत? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मित्रांची आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे.

सिमरन गुरुग्रामच्या सेक्टर 47 येथील कोठी नंबर 59मध्ये राहत होती. याच ठिकाणी गुरुवारी तिचा मृतदेह सापडला. सिमरनसोबत राहणाऱ्या मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सिमरनच्या आत्महत्येचं प्रकरण उघड झालं. सिमरनने जम्मूच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं होतं. ती अत्यंत हुशार होती. रेडियो मिर्चीमध्ये ती आरजे म्हणून नियुक्त झाली होती. तिच्या आवाजात जादू होती. लहान वयातच ती अत्यंत लोकप्रिय झाली होती. जम्मू की धडकन म्हणूनही तिला ओळखलं जायचं. ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत. सिमरनने इन्स्टाग्रामवर 13 डिसेंबर रोजी शेवटची पोस्ट केली होती. न संपणारं हास्य…आणि गाऊन परिधान करून एक तरुणी समुद्र किनारी… अशी कॅप्शन तिने व्हिडिओला दिली होती.

2021 मध्ये जम्मूवरून गुरुग्रामला शिफ्ट

सिमरन ही मूळची जम्मूच्या नानक नगरची राहणारी होती. तिने रेडिओ मिर्चीमध्ये काही वर्ष काम केलं. त्यानंतर नोकरी सोडून 2021मध्ये सिमरन गुरुग्राममध्ये शिफ्ट झाली. या ठिकाणी तिने काही मित्रांसोबत मिळून तिने एक कोठी भाड्याने घेतली होती. सर्व मित्र मिळून या कोठीत राहायचे.

या ठिकाणी सिमरन फ्रिलान्सर म्हणून काम करत होती. ती सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह. तिच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत होते. आता सिमरन या जगात नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले आहेत. ती आजोबाच्या एकदम जवळ होती. आईवडिलांची ती लाडकी होती. तिच्या निधनाने संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये शोक पसरला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

सिमरनच्या मृत्यूवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांनी सिमरनचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक आणि फॅन्सबाबत संवेदना व्यक्त केली आहे. सिमरनचा आवाज जम्मू-काश्मीरच्या भावनेशी जोडलेला होता. आपल्या सांस्कृतिक परिवेशात तिचं योगदान कायम राहील. ती जम्मू-काश्मीरच्या कायम स्मरणात राहील, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.