Punjabi Singer : प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन, संपूर्ण कला विश्वात शोक

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. (Famous singer Sardul Sikandar dies due to corona)

Punjabi Singer : प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन, संपूर्ण कला विश्वात शोक
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 3:48 PM

मुंबई : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर (Sardool Sikandar) यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. गेले अनेक दिवस ते दवाखान्यात दाखल होते. त्यांनी मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती आहे.त्यावेळी त्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यादरम्यान त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Famous singer Sardul Sikandar dies due to corona)

मंगळवारी सकाळी सरदूल सिकंदर यांचा मृत्यू

मंगळवारी सकाळी सरदूल सिकंदर यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सरदूल सिकंदर हे एक पंजाबी गायक होते. 1980च्या दशकात सरदूल यांनी आपला पहिला अल्बम “रोडवेज द लारी” जारी केला होता. यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सरदूल सिकंदर यांनी अनेक हिट गाणी दिली आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची झलक दिली आहे. ऑगस्ट 1961 रोजी त्यांचा जन्म झाला. सरदूल सिकंदर यांनी “जग्गा डाकुरा” या पंजाबी चित्रपटात आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांना प्रभावित केलं.

पंजाबचा हिरा हरवला

पंजाबचा हा हिरा हरवण्याचा शोकाकळा उद्योग आणि राजकारणातही पसरला आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी सरदूल सिकंदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुखबीरसिंग बादल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं – “प्रसिद्ध पंजाबी पार्श्वगायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाबद्दल बातमी ऐकून मला वाईट वाटलं. पंजाबी चित्रपट आणि संगीत उद्योगाचं हे मोठं नुकसान आहे. त्याच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि चाहत्यांसाठी प्रार्थना. देव त्यांचा आत्मास शांती देवो! ”

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सरदुल सिकंदर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- “महान पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांच्या निधनाबद्दल कळल्यावर फार वाईट आहे. नुकतंच तो कोविड 19 चा शिकार झाला  होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांविषयी माझे मनःपूर्वक संवेदना.”

संबंधित बातम्या

Video : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा ‘#Pawri’ टाईम, पाहा व्हिडीओ

Marathi Movie | दोन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कथा, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.