Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली….

दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हीची फॅन फॉलोइंग इतकी जबरदस्त आहे की, तिचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात सापडतील. नुकत्याच या दक्षिणात्य अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली....
रश्मिका मंदना
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 3:50 PM

मुंबई : दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हीची फॅन फॉलोइंग इतकी जबरदस्त आहे की, तिचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात सापडतील. नुकत्याच या दक्षिणात्य अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, तिच्या एका चाहत्याने रश्मिका मंदनाला तिच्या आवडत्या आयपीएल संघाबद्दल विचारले. ज्याला अभिनेत्रीने असे उत्तर दिले की, ते ऐकताच चाहते देखील खूप खुश झाले (Fan Ask Rashmika Mandanna Favorite IPL Team Actress Gives Reply).

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रश्मिका मंदनाच्या एका चाहत्याने विचारले, ‘तुमचा आवडता आयपीएल संघ कोणता?’ त्यावर अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली, ‘ई साला कप नमदे’ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू. ‘ई साला कप नमदे’ हा विराट कोहली यांच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबी टीमचा नारा आहे. ही उत्तरे ऐकून आरसीबी चाहते आनंदी झाले. रश्मिकाने हे उत्तर हाताने हृदय देखील तयार केले होते.

पाहा व्हिडीओ

रश्मिका मंदाना ही तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. रश्मिकाने 2016मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. 2017 मध्ये तिने ‘चमक’ आणि ‘अंजनी पुत्र’ असे दोन सुपरहिट चित्रपट दिले. 2018 मध्ये रश्मिकाने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत ‘चलो’ द्वारे प्रवेश केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. रश्मिका मंदाना विजय देवरकोंडासमवेत ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’मध्ये दिसली आहे. तिचे हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरले होते (Fan Ask Rashmika Mandanna Favorite IPL Team Actress Gives Reply).

रश्मिका मंदानाने नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. अलीकडेच ती रॅपर बादशाह, युवा शंकर आणि उचना अमित यांच्या ‘टॉप टकर’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, रश्मिकाने तिचा दुसरा हिंदी चित्रपट ‘गुडबाय’ देखील साईन केला आहे, ज्यात अमिताभ बच्चन तिच्यासोबत दिसणार आहेत. बॉलिवूडमध्ये रश्मिका मंदना ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार आहे.

शाहिदच्या ‘जर्सी’ला नकार

दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने धुमाकूळ घातल्यानंतर आभिनेतत्री रश्मिका मंदना आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या हातात बॉलिवूडचे 2 मोठे चित्रपट आहेत. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​रश्मिका सोबत दिसणार आहे. अलीकडेच रश्मिकाने देखील सिद्धार्थबरोबर ‘मिशन मजनू’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. पण तुम्हाला माहिती आहे का की, रश्मिकाला तेलुगू जर्सीच्या (Jersey) हिंदी रिमेकसाठीही संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने हा चित्रपट करण्यास चक्क नकार दिला.

रिपोर्ट्सनुसार रश्मिकानेही चित्रपटाला होकार दिला होता. पण, नंतर तिने तिला नकार दिला. वृत्तानुसार, रश्मिकाला वाटले की ती श्रद्धा श्रीनाथची भूमिका साकारू शकत नाही, म्हणूनच तिने हा प्रकल्प करण्यास नकार दिला आहे. रश्मिकाने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ज्या चित्रपटात तिला असे वाटते की आपण आपले सर्वोत्तम देऊ शकणार नाही, तेव्हा ती सरळ नकार देते. तिच्या मते, जर्सीचा रिमेक खूप मोठा चित्रपट असणार आहे. कोणीही हा चित्रपट करू शकते. परंतु, तिला सेटवर उपस्थित राहण्याची इच्छा नाही, असे होऊ नये आणि तिला दिवसभर थकवा जाणवू नये, म्हणून तिने नाकारला आहे.

(Fan Ask Rashmika Mandanna Favorite IPL Team Actress Gives Reply)

हेही वाचा :

Indian Idol 12 | सवाई भटचं गाणं ऐकून खुश झाले अनु मलिक, पोडीयमवर उभे राहत म्हणाले…

खतरनाक स्टंट करत टायगर श्रॉफने मारली पूलमध्ये उडी, सोशल मीडियावर video चर्चेत!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.