जब्याला काळी चिमणी घावली राव ! शालू-जब्याचा ‘तो’ फोटो पाहून चर्चेला उधाण
Rajeshwari Kharat And Somnath Awghade : 'फँड्री' चित्रपटात एकत्र दिसलेले राजेश्वरी आणि सोमना यांच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर लई चर्चा सुरू आहे. कशी काय मग जोडी ? असा प्रश्न विचारलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी एकाहून एक सरस उत्तर देत कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव केला ना राव !
2013 साली नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘फँड्री’ चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील जब्या- शालू यांचीदेखील खूप चर्चा झाली . राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान पटकावून आहे. आता पुन्हा शालू-जब्याची ही जोडी चर्चेत आली आहे, त्याला कालेरणही तसंच खास आहे.
‘फँड्री’मध्ये शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. तिने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय, ज्यामुळे तूफान चर्चा सुरू झाली आहे. राजेश्वरीने तिचा आणि सोमनाथचा एक फोटो शेअर करत ‘कशी काय मग जोडी’ अशी कॅप्शन आणि त्यासोबतच हार्टचा इमोजीदेखील शेअर केला आहे. त्यासोबतच तिने #shalu #jabya #forever असे टॅग्सही दिले आहेत.
View this post on Instagram
तो फोटो आणि कॅप्शन पाहून विविध चर्चांना उधाण आलं आहे. राजेश्वरी सोमनाथच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव झालाय. चित्रपटात जब्याचं प्रेम अपूर्ण राहिल, प्रत्यक्षत प्रेम मिळालं का अशा आशयाच्या कमेंट्स आणि चर्चा सुरू झाली आहे.
फोटोवर कमेंट्सचा पाऊस
‘काळी चिमणी घावली जब्याला’, अशी कमेंट एका युजरने केली तर ‘नागराज सरने बनादी जोडी’ अशी कमेंट लिहीत एका युजरने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनाच श्रेय देऊन टाकलं. ‘Fandry चा sequel यायला पाहिजे’ अशीही मागणी एका चाहत्याने केली. तर काही युजर्सनी थेट ‘फँड्री’ चित्रपटातील गाणीच कमेंट म्हणून पोस्ट केलीत. तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, माझा जब्या ग जब्या शालू वर मरतो अशा कमेंट्सही काहींनी केल्या आहेत. अय जब्या ! तू शालू तुला पटली का रं.. असा सवालही एका चाहत्याने कमेंटमधून विचारला आहे. जोडी जबरदस्त, खूप छान जोडी, असं लिहीत अनेकांनी राजेश्वरी सोमनाथच्या जोडीलाच एक लाईक देऊ टाकलाय.
शालू-जब्या एकत्र ?
गेल्या वर्षीही राजेश्वरी आणि सोमनाथ यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसून आले. राजेश्वरीने एक व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर रेड कलरमध्ये लव्ह इमोजी टाकला होता. त्यामुळे हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. तर आजच्या या नव्या फोटोमुळेही ते दोघं पुन्हा चर्चेत आलेत.
View this post on Instagram