2000 कोटींची कमाई,आमिर खानसोबत लग्नाच्या अफवा अन् रातोरात स्टार; अभिनेत्रीची चर्चा फारच
अशी एक अभिनेत्री जिने तिच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं आणि खास स्थान बनवलं आहे. बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेली अभिनेत्री आता बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. 2000 कोटींची कमाई केलेल्या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं. कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडमध्ये नवे चेहरे असो किंवा स्टारकिडस् प्रत्येकाला आपली ओळख बनवायला मेहनत ही घ्यावीच लागते. त्यातील काही यशस्वी होतात तर काहींना थेट फिल्म इंडस्ट्रीच सोडावी लागते तर काहीजण या इडस्ट्रीत कोणाच्याही शिफारसीशिवाय आपलं अस्तित्व निर्माण करतात. बरं मग त्या अभिनेत्री असो किंवा अभिनेता.
लहानपणीच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल
अशी एक अभिनेत्री आहे जिने खरंतर लहानपणीच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. त्यानंतर तिने अनेक मोठ्या अभिनेत्यासोबत कामे केली. ही अभिनेत्री तिच्या कष्टांने पुढे गेली. आज ती तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. एवढच नाही तर एका चित्रपटामुळे या अभिनेत्रीचं असं नशीब पालटलं की ती चक्क रातोरात स्टार बनली. ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख.
2070 कोटींची कमाई केलेला ‘दंगल’ ठरला टर्निंग पॉइंट
फातिमाने तिचे बॉलिवूड करिअर ‘चाची 420’ चित्रपटात बालकलाकारांच्या भूमिकेतून 1997 सुरू केली. परंतु तिला खरी ओळख मिळाली 2016 मध्ये रिलीज झालेला आमिर खानच्या ‘दंगल’मधून. या चित्रपटात तिने कुस्तीपटू गीता फोगटची भूमिका साकारली आणि त्यासाठी तिने जबरदस्त शारीरिक प्रशिक्षण घेतले होते.
‘दंगल’ने भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आणि जागतिक स्तरावर 2070 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला, ज्यामुळे या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये एक मोठी स्टार म्हणून ओळख मिळाली.
आमिर खानसोबत रिलेशनच्या चर्चा
एवढच नाही तर या चित्रपटानंतर तिच्या आणि आमिर खानच्या नात्याबद्दलही अफवा पसरू लागल्या होत्या. हे दोघेही लग्न करणार असही म्हटलं जात होतं. पण या चर्चेवर दोघांनीही कोणतही भाष्य कधी केलं नाही.
‘दंगल’च्या यशानंतर, फातिमाने ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ (2018), ‘लुडो’ (2020), ‘साम बहादूर’ (2023) आणि ‘अजीब दास्तानें’ (2021) यांसारख्या चित्रपटांमध्ये आपला अभिनय दाखवला. यासोबतच, ती आपल्या कलेच्या बाबतीत सातत्याने नाविन्य आणि बदल साधत आहे.
View this post on Instagram
‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्ये ती अमिताभ बच्चन आणि आमिर खानसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर होती, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तरीही, फातिमाच्या अभिनयाने नेहमीप्रमाणे सर्वांची मने जिंकली. फातिमाने आपल्या शालेय आणि कॉलेज जीवनात लहान-मोठ्या अभिनयाचे प्रयोग केले होते.
फातिमाचा नवीन चित्रपट लवकरच
फातिमा सना शेख हे सध्या बॉलिवूडमधील एक यशस्वी नावांच्या यादीत घेतलं जातं. तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आणि संघर्षाने तिच्या करिअरला एक खास स्थान दिलं आहे.
फातिमा सना शेखच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 15-20 कोटी रुपये आहे. आगामी काळात, ती अनुराग बासूच्या ‘मेट्रो…इन दिनो’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच तिच्या नवीन भूमिकेची उत्सुकता लागून राहिली आहे.