Filmfare Awards 2021 | इरफान खानचा मरणोत्तर सन्मान, ट्रॉफी स्वीकारताना लेक बाबील झाला भावूक!
66वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2021) शनिवारी रात्री मुंबईत पार पडला. दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan) याचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरने सन्मान करण्यात आले.
मुंबई : 66वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2021) शनिवारी रात्री मुंबईत पार पडला. दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan) याचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरने सन्मान करण्यात आले. इरफानचा सन्मान त्याच्यावतीने त्याचा मुलगा बाबील खान याने स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना बाबील अतिशय भावूक झाला होता. वडिलांच्या आठवणी आणि त्यांचा सन्मान पाहून तो भरवून गेला होता (Filmfare Awards 2021 Irrfan khan Son Babil khan pickups the trophy and get emotional).
या कार्यक्रमात दिवंगत अभिनेते इरफान खान यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. इरफान खान यांचा मुलगा बाबील खान हा देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीतपदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी दिवंगत अभिनेत्याच्या अर्थात आपल्या वडिलांच्या अनेक आठवणी शेfilmfare award winners, filmfare awards 2021, Irfan Khan, Babil khanअर करत असतो.
वडिलांच्या आठवणी जपून ठेवतोय बाबील
इरफान खानचा मुलगा बबील नेहमीच सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांचे फोटो, व्हिडीओ आणि आठवणी शेअर करत असतो. जवळजवळ दररोज, तो इरफान खानची आठवण करण्यासाठी एखादी पोस्ट शेअर करतो आणि त्याला हृदयस्पर्शी कॅप्शन देखील देतो. अलीकडेच बाबीलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या डायरीमध्ये इरफानने लेक बाबील याच्यासाठी काही अभिनयाच्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत. लवकरच बाबील बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. बाबीलने लंडनच्या फिल्म स्कूलमधून पदवी शिक्षणही घेतले आहे.
पाहा बाबीलचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
View this post on Instagram
(Filmfare Awards 2021 Irrfan khan Son Babil khan pickups the trophy and get emotional)
इरफानच्या डायरीचा हा व्हिडीओ शेअर करताना बाबीलने लिहिले की, ‘हे पुस्तक मला बाबांच्या वॉर्डरोबमधून नुकतेच मिळाले आहे. मी 12 वर्षांचा असताना ही डायरी त्यांना भेट दिली होती. या डायरीमध्ये त्यांनी अभिनयाचे बारकावे सांगणाऱ्या नोट्स माझ्यासाठी लिहिल्या आहेत. मला वाटते की, माझे फिल्म स्कूलमधील शिक्षण संपल्यानंतर त्यांना मला हे शिकवायचे होते.’
पुस्तकाच्या आतील काही पाने दाखवताना बाबीलने लिहिले की, ‘मी तुमच्याबरोबर पहिल्या काही नोट्स शेअर करत आहे. कारण, आपण मला एक चांगला माणूस मानले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.’ पुस्तकातील पुढचे 4 मुद्दे दाखवताना लिहिले की, ‘जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील, तर माझ्या क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे. कारण अशा बर्याच गोष्टी आहेत, ज्या मला समजल्याही नाहीत आणि आता मी त्यांना (बाबांना) विचारूही शकत नाही.’
(Filmfare Awards 2021 Irrfan khan Son Babil khan pickups the trophy and get emotional)
हेही वाचा :
केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात… आईच्या निधनानंतर डॉ. गिरीश ओक यांची डोळे ओलावणारी कविता