आमीर नाही, ‘तारे जमीं पर’चा खरा दिग्दर्शक मी होतो, अमोल गुप्तेंना 14 वर्षांनीही खुपते?

सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून आमीर खानचं नाव लागलं. तर अमोल गुप्ते यांना लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून उल्लेख होता. (Amole Gupte on Aamir Khan)

आमीर नाही, 'तारे जमीं पर'चा खरा दिग्दर्शक मी होतो, अमोल गुप्तेंना 14 वर्षांनीही खुपते?
अमोल गुप्ते आमीर खान
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:59 AM

मुंबई : 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारें जमीं पर‘ (Taare Zameen Par) चित्रपटाने प्रेक्षकांवर वेगळंच गारुड केलं होतं. आठ वर्षांच्या इशान अवस्थीचा प्रवास पाहून थिएटरमधील प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते. डिस्लेक्सिक चिमुरड्याची सर्वसामान्य जीवन जगण्याची आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड सगळ्यांच्या मनाला भिडली होती. नुकतंच या सिनेमाचे लेखक अमोल गुप्ते (Amole Gupte) यांनी मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खान (Aamir Khan) नाही, तर आपणच दिग्दर्शकाच्या खुर्चीत होतो, असं गुपित उघड केलं. (Filmmaker Amole Gupte on infamous feud with superstar Aamir Khan over Taare Zameen Par credits)

ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

‘तारें जमीं पर’ चित्रपटात बालकलाकार दर्शिल सफारीने साकारलेली इशान अवस्थी ही मुख्य व्यक्तिरेखा होती, मात्र इशानला मार्गदर्शन करणारे निकुंभ सर अर्थात आमीर खानने साकारलेली भूमिकाही तितकीच वजनदार होती. या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअरने गौरव करण्यात आला होता. कुटुंब कल्याण विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तर ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परभाषिक विभागातील भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘तारें जमीं पर’ चित्रपट पाठवण्यात आला होता.

मतभेदांमुळे आमीर खानने दिग्दर्शन घेतलं

सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून आमीर खानचं नाव लागलं. तर अमोल गुप्ते यांना लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून उल्लेख होता. खरं तर अमोल गुप्ते सुरुवातीला ‘तारें जमीं पर’ चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मात्र मतभेदांमुळे अर्ध्यावर आमीर खानने त्यांच्याकडील कमान हाती घेतली.

भूतकाळात रमत नाही

बॉलिवूड बबलने नुकतंच अमोल गुप्ते यांना त्याविषयी पुन्हा छेडलं. “या घटनेला आता बराच काळ लोटला आहे आणि त्याचा आता मला काहीच फरक पडत नाही. सूर्यास्तानंतर नेहमीच सूर्योदय होतो आणि मी भूतकाळात रमत बसणारी व्यक्ती नाही, जी सतत दुःखाचे कढ उकळत बसेल. आलेला प्रत्येक दिवस बैलासारखा शिंगांवर घेण्यावर मी विश्वास ठेवतो आणि नवीन दिवसात आपल्यासाठी काय आहे, ते पाहतो. गेल्या 14 वर्षांपासून आपली कला जोपासत चित्रपटसृष्टीत टिकून राहू शकण्याचे हे एकमेव कारण आहे.” असं अमोल गुप्ते सांगतात.

संबंधित बातम्या :

आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!

(Filmmaker Amole Gupte on infamous feud with superstar Aamir Khan over Taare Zameen Par credits)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.