Anushka Sharma Birthday : विराटने अनुष्काला काय बड्डे गिफ्ट दिलं? कोणत्या फोटोची होतेय चर्चा, जाणून घ्या
सध्या अनुष्का सध्या आयपीएलच्या बायो-बबलमध्ये विराटसोबत आहे. बायो-बबलमध्येच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohali) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज 34 वर्षांची झालीय. अनुष्का शर्माने रब ने ना दी जोडी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बॅन्ड बाजा बारात, पटियाला हाऊस, जब तक है जान, पीके, दिल धडकने दो, सुल्तान, ए दिल है मुश्किल, सुई धागा, झीरो या सिनेमांमध्ये तिने काम केलंय. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आता ती ‘चकडा एक्स्प्रेस’मधून चित्रपटात पुनरागमन करत आहे. यात ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सध्या अनुष्का सध्या आयपीएलच्या बायो-बबलमध्ये विराटसोबत आहे. बायो-बबलमध्येच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आता विराट आणि अनुष्काची तर चर्चा होणार ना. एकीकडे मोठा क्रिकेटर तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अशी ही जोडी. मात्र, अनुष्काचा यावेळेसचा वाढदिवस (Birthday) विराटसाठी स्पेशल दिसतोय.
कुठे झालं बड्डे सेलिब्रेशन
यावेळी कोहली आणि अनुष्कासोबत आरसीबीचे अनेक खेळाडू आणि त्यांच्या पत्नी दिसून आल्या आहेत. विराटने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. कोहलीने दोन फोटो पोस्ट करत देवाचे आभार मानले. विराटनं लिहिलंय की, तुझा जन्म झाला देवाचे आभार. तुझ्याशिवाय मी काय केले असते हे मला माहित नाही. तू आतून खरोखर सुंदर आहेस. आजूबाजूच्या सर्वात गोंडस लोकांसह एक छान दुपार.” कोहलीने दोन फोटो शेअर केले. एक अनुष्कासोबत आणि दुसरा आरसीबी टीम आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांसोबत. यात डेनिश सैत देखील आहे जो ‘मिस्टर नाग’ च्या भूमिकेत दिसत आहे.
विराट कोहलीचं ट्विट
Thank god you were born ❤️. I don’t know what I would do without you. You’re truly beautiful inside out ❤️. Had a great afternoon with the sweetest folks around ?@AnushkaSharma pic.twitter.com/JxGEnBtHXW
— Virat Kohli (@imVkohli) May 1, 2022
फोटोत दिनेश कार्तिकही
कोहलीचा सहकारी दिनेश कार्तिकसोबत लग्न करणारी स्क्वॅश स्टार दीपिका पल्लीकल देखील फोटोमध्ये दिसत आहे. तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अनुष्काने गुजरात टायटन्स आणि आरसीबीच्या सामन्यादरम्यान दीपिका पल्लीकल स्टँडमध्ये दिसली होती. या सामन्यात कोहलीने सीजनमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. यावेळी अनुष्का आनंदाने डोलताना दिसून आली.
आयपीएलमध्ये विराट व्यग्र
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये विराट कोहलीने 40 हून अधिक धावा केल्या होत्या. पण पन्नास पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. तो फॉर्ममध्ये परतलाय पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कोहलीचा स्ट्राईक रेटही 110 च्या खाली होता. विराटला पुढील सामन्यांमध्ये हा फॉर्म कायम ठेवायला आवडेल.