Poonam Pandey | पूनम पांडे पुन्हा एकदा वादात, गोव्यात एफआयआर दाखल!

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Poonam Pandey | पूनम पांडे पुन्हा एकदा वादात, गोव्यात एफआयआर दाखल!
अभिनेत्री पूनम पांडे आता नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी चक्क पूनम विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 5:45 PM

मुंबई : मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे (Actress Poonam Pandey) नेहमीच काहीना काही वादांमुळे चर्चेत आहे. यावेळी खुद्द पूनम विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.(FIR against Actress Poonam Pandey at Goa Police station)

लग्नानंतर गोव्याला गेलेली पूनम पांडे नुकतीच मुंबईत परतली आहे. पूनम पांडेचा सदर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या कलम 294 अन्वये पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. पुढील कारवाईदरम्यान गोवा पोलीस पूनम पांडेला हजर राहण्याचे आदेश देऊ शकतात.

लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात पतीकडून मारहाण

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. लग्नानंतर अवघ्या 13 दिवसानंतर पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. हनिमूनसाठी गोव्याला गेलेल्या या जोडीमध्ये जोरदार भांडणे सुरू झाली होती. या दरम्यान पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. तसेच, तिने हे नाते तोडत, घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले होते. (FIR against Actress Poonam Pandey at Goa Police station)

सॅम बॉम्बेने पूनमला इतकी मारहाण केली होती की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पूनमच्या तक्रारीवरून सॅमला अटक करण्यात आली होती. यानंतर काहीवेळाने त्याला जामीन देखील मिळाला होता.

पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी पतीने दिल्याचा दावाही तिने केला होता. वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गोवा कोर्टाने सॅम बॉम्बे याची सुटका केली होती. दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात पूनम पांडे शूटिंग करत असलेल्या चित्रपटाच्या ठिकाणी हा प्रकार घडला होता.

(FIR against Actress Poonam Pandey at Goa Police station)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.