FRIENDS फेम Chandler रिलेशनशीपमध्ये, 51 वर्षीय मॅथ्यू पेरीची तिशीच्या गर्लफ्रेण्डसोबत एंगेजमेंट

51 वर्षीय अभिनेता मॅथ्यू पेरीने 29 वर्षीय गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झला प्रपोज केलं असून तिने होकार दिला

FRIENDS फेम Chandler रिलेशनशीपमध्ये, 51 वर्षीय मॅथ्यू पेरीची तिशीच्या गर्लफ्रेण्डसोबत एंगेजमेंट
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 6:19 PM

न्यूयॉक : ‘फ्रेंड्स’ (Friends) या गाजलेल्या अमेरिकन सीरिजची पारायणं भारतीय प्रेक्षकांनीही केलेली आहेत. शँडलरच्या (Chandler Bing) भूमिकेतून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला अभिनेता मॅथ्यू पेरी (Matthew Perry) एंगेज्ड झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जपलेलं गुपित मॅथ्यूने उघड केलं. (FRIENDS fame Chandler Actor Matthew Perry gets engaged to Girlfriend Molly Hurwitz)

51 वर्षीय मॅथ्यू पेरीने नुकतीच ही खुशखबर दिली. मॅथ्यूने 29 वर्षीय गर्लफ्रेण्ड मॉली हर्विट्झ (Molly Hurwitz) हिला प्रपोज केलं. “मी एंगेजमेंट करायचे ठरवले. सुदैवाने, मी पृथ्वीतलावरील सर्वात महान तरुणीला डेट करत आहे.” अशा शब्दात मॅथ्यूने आपला आनंद व्यक्त केला.

मॉली हर्विट्झ ही साहित्य क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून काम करते. तिने यावर्षी व्हॅलेंटाईन डेपासून आपण अभिनेते मॅथ्यू पॅरीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा दुजोरा दिला. तिने सोशल मीडियावर लिहिले होते, “माझा व्हॅलेंटाईन म्हणून दुसरं वर्ष, मात्र इन्स्टाग्रामवर त्याचं हे पहिलंच वर्ष आहे” मॅथ्यू पेरी या वर्षी फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर आला होता.

‘फ्रेण्ड्स’ मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर

मॅथ्यू पेरी जवळपास चाळीस वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. बॉईज विल बी बॉईज, सिडनी, हायवे टू हेवन, होम फ्री अशा अनेक सीरिजमध्ये तो झळकला. मात्र 1994 मध्ये ‘फ्रेण्ड्स’ मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. फक्त अमेरिकन नाही, तर जगभरातील प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला. पंचवीस वर्षांनंतरही ही सीरिज आणि त्यातील व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.

मॅथ्यू पेरीने अलिकडेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या ‘फ्रेंड्स रियुनियन स्पेशल’च्या शूटिंगची अपडेट शेअर केली होती. “फ्रेण्ड्स रियुनियन मार्चच्या सुरुवातीस रिशेड्यूल करण्यात आले आहे. बहुतेक पुढचं वर्ष कमालीचं बिझी जाणार आहे. आणि मला हे आवडतंय ” असं पेरीने ट्विट केलं होतं.

मॅथ्यू पेरीने 1995 मध्ये अभिनेत्री यास्मिन ब्लिथला डेट केलं होतं. अवघ्या वर्षभरातच त्याने प्रख्यात अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचं अफेअर जेमतेम दोन वर्षच टिकलं. त्यानंतर 2006 ते 2012 ही सहा वर्ष तो अभिनेत्री एलिझाबेथ उर्फ लिझी कॅप्लनसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

हेही वाचा :

नव्या नात्यामुळे आमिर खानची लेक पुन्हा चर्चेत, कोण आहे इरा खानचा हा नवा बॉयफ्रेंड?

नेहा महाजनच्या सितारवादनाचा सातासमुद्रापार डंका, रिकी मार्टीनसोबतच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी’ नॉमिनेशन!

शाहरुखच्या लेकीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सुहानाच्या नव्या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स

(FRIENDS fame Chandler Actor Matthew Perry gets engaged to Girlfriend Molly Hurwitz)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.