दिलीप कुमार यांचा तो मित्र, जो त्यांना फटकारु देखील शकत होता आणि…

| Updated on: Jan 03, 2023 | 5:59 PM

'तैयब अली- प्यार का दुश्मन', दिलीप कुमार आणि त्यांच्या आयुष्यातील खास मित्र, शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही साथ

दिलीप कुमार यांचा तो मित्र, जो त्यांना फटकारु देखील शकत होता आणि...
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या सिनेमांमुळे कमी आणि मैत्रीमुळे कायम प्रसिद्धीझोतात आहे. अशाच सेलिब्रिटी मित्रांच्या जोडी मधील एक म्हणजे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि मुकरी. या दोघांच्या मैत्रीचे किस्से आजही जगप्रसिद्ध आहेत. दिलीप कुमार आणि मुकरी यांची मैत्री फक्त रिल लाईफमध्येच नाही, तर रियल आयुष्यात देखील फार घट्ट होती. दिलीप कुमार यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये मुकरी यांच्याबद्दल अनेक किस्से सांगितले आहेत.

‘मुकरी, अंजुमन-ए-इस्लाममध्ये शालेय जीवनातील मित्र होते आणि बॉम्बे टॉकीजमध्ये येण्याआधी मुकरी अभिनेते झाले होते. त्यामुळे त्यांना पूर्ण हक्क होता की त्यांना माझ्या कोणत्या गोष्टीचा राग आला तर ते मला स्पष्ट बोलू शकत होते, फटकारु देखील शकत होते. कारण ते माझ्यासाठी वरिष्ठ होते. आमच्यात काही तरी सामान्य होतं म्हणून आमची इतकी चांगली मैत्री होती.’

तर मुकरी यांची मुलगी म्हणाली, दिलीप कुमार मुकरी यांच्यापेक्षा मोठे होते. मुकरी आणि दिलीप यांचे भाऊ नासिर खान वर्गमित्र होते. पण मुकरी आणि दिलीप यांची मैत्री खास होती. मुकरी, दिलीप कुमार यांना फटकारु देखील शकत होते, तर दुसरीकडे एका रात्री मुकरी दिलीप कुमार यांच्या बेडवर झोपले होते.

जेव्हा दिलीप कुमार झोपण्यासाठी रुममध्ये गेले, तेव्हा त्यांच्या बेडवर मुकरी झोपले होते. हा दिलीप कुमार यांच्यासोबत केलेला प्रँक नव्हता. तर मुकरी यांना त्यांच्या रुममध्ये एकट्यांना झोपण्यासाठी भीती वाटत होती म्हणून ते दिलीप कुमार यांच्या बेडवर झोपले.

दिलीप कुमार आणि मुकरी यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. २००० मध्ये जेव्हा मुकरी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा दिलीप कुमार आणि सायरा बानो सतत डॉक्टरांच्या संपर्कात होत्या. पुढच्या काही दिवसांत मुकरी यांची प्रकृती स्थिर झाली.

प्रकृती स्थिर झाल्यानंतर मुकरी यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. याच दरम्यान, दिलीप कुमार लाखनऊ याठिकाणी गेले. पण मुकरी यांच्यासाठी सायरा बानो मुंबईतच राहिल्या. पण दिलीप कुमार मुंबईत परतण्याआधीच ४ सप्टेंबर रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतला.