अमिताभ बच्चन ते सलमान खानपर्यंत… या स्टार्सनी पहिल्या कमाईतून कोणती कार खरेदी केली माहित्ये ?
First Car Of Bollywood Stars : बॉलिवूड स्टार्सकडे आलिशान कार्सची काही कमतरता नाही. पण तरीही पहिली कार ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची असते. तसेच काहीसे या सेलिब्रिटींचेही आहे. सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत सगळ्यांनाच त्याच्या पहिल्या कारबद्दल खूप प्रेम वटातं.
मुंबई : स्वत:चं घर, चांगली नोकरी आणि दारात एखादी कार (car)किंवा गाडी असावी, हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. या गोष्टींचे त्याच्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण स्थान असते. बॉलीवूड स्टार्सबद्दल (bollywood stars) बोलायचे झाले तर त्यांना कशाचीही कमतरता नसते, भरपूप पैसा, आलिशान घरं, उत्तम गाड्या या सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे असतात. पण तरीही काही गोष्टी त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ असतात. उदाहरणार्थ – स्वतःच्या कमाईने खरेदी केलेली पहिली कार (first car with earning) . बॉलिवूडचा भाईजान सलमान खानपासून ते बिग बी अमिताभ बच्चनपर्यंत, या सेलिब्रिटींनी पहिली कार कोणती खरेदी केली होती, ते जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे महानायक म्हणूनही ओळखले जातात. ते बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. बिग बींना वाहनांची खूप आवड आहे. त्यांच्या ताफ्यात एकापेक्षा एका अशा महागड्या कार्स आहेत. पण अमिताभ यांनी त्यांच्या चित्रपटाचे मानधन म्हणून मिळणारे पैसे साठवून पहिल्यांदाच सेकंड हँड फियाट कार खरेदी केली. ही कार कलकत्ता येथून खरेदी करण्यात आली होती. कारण ही कार त्यावेळी मुंबईत खूप महाग होती.
View this post on Instagram
सलमान खान
अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच सलमान खानचीही पहिली कार सेकंड हँड होती. मिळालेल्या माहितीनुसार, हेराल्ड कारचा वापर ऋषी कपूर यांच्या ‘जमाना’ चित्रपटात करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिली होती. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ही कार सलमानने खरेदी केली होती.
View this post on Instagram
अक्षय कुमार
अक्षय कुमारकडेही मोठमोठ्या, चांगल्या कार्सचा संग्रह आहे. पण त्याची पहिली कार अजूनही त्याच्या हृदयाच्या जवळ आहे. अक्षयकडे अजूनही पहिली कार आहे, असे मानले जाते. खिलाडी कुमारने पहिल्यांदा फियाट कार खरेदी केली होती. अक्षयने ही गाडी घेऊन थेट शिर्डी गाठली.
View this post on Instagram
शाहरुख खान
शाहरुख खानची अथक मेहनत आणि समर्पण सर्वांनाच माहीत आहे. आज शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, किंग खानची पहिली कार ओम्नी होती. मात्र, ही कार त्याला त्याच्या आईने भेट म्हणून दिली होती.