कंगना रणौत ते सलमान खानपर्यंत; बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींनी भर गर्दीत खाल्लाय मार
असे अनेक बॉलिवूड आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत कानाखाली मारण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या यादीत अनेक बड्या स्टार्सचाही समावेश आहे.
अनेक वेळा सेलिब्रिटींसोबत अशा काही घटना घडतात ज्या अचानक घडल्यामुळे त्यांनाही धक्का बसला आहे. जसं की गर्दीत बऱ्याचदा सेलिब्रिटींना जाणून-बुजून धक्का मारण्यात येतो, किंवा हात लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत कानाखाली मारण्यात आल्याचा प्रकार घडला. या यादीत अनेक बड्या स्टार्सचाही समावेश आहे.
भाईजान सलमान खान
बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से घडले आहेत की ज्यामुळे बहुतेकजण हे सलमान खानपासून सावध असतात. पण एक असा प्रसंग घडला होता की,सलमान खानला चक्क थप्पड पडली होती. 2009 मध्ये सलमान खानबद्दलची एक बातमी समोर आली होती की, एका पार्टीत दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या मुलीने त्याला थप्पड मारली होती. मात्र, यावर सलमानने फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती.
कंगना रणौत
कंगना रणौत चंदिगड विमानतळावरून मुंबईला जात असताना सीआयएसएफच्या महिला अधिकाऱ्याने तिला थप्पड मारली होती. ही घटना काहीच महिन्यांपूर्वी घडली आहे. आणि बऱ्यापैकी ती बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
गौहर खान
2014 मध्ये एका सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये गौहर खानलाही एका व्यक्तीने थप्पड मारली होती. असे म्हटले जात होते की, या व्यक्तीला अभिनेत्रीच्या बोल्ड ड्रेस आणि डान्सची चीड आली होती आणि म्हणूनच त्याने हे कृत्य केले.हा किस्साही प्रचंड गाजला होता. े
रणवीर सिंह
2022 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंहला एका अंगरक्षकाकडून चुकून थप्पड मारली गेली होती. मात्र, त्यादरम्यान रणवीर त्याच्यावर न चिडता चेहऱ्यावर हात ठेवून हसत राहिला होता.
आदित्य नारायण
2011 मध्ये आदित्य नारायणबद्दल बातमी आली होती की, एका मुलीने त्याला पबमध्ये थप्पड मारली होती. अभिनेत्याने याबद्दल बोलताना सांगितले होते की, त्याचा तिच्याशी वाद झाला होता परंतु मुलीने थप्पड मारली नव्हती. ती मुलगी केवळ प्रसिद्धीसाठी खोटं बोलत आहे.
अमृता राव
प्यारे मोहन चित्रपटाच्या सेटवर ईशा देओलनेच अमृता रावला थप्पड मारली होती. ईशाने स्वत: याला दुजोरा दिला आणि म्हटलं होतं “होय, मी अमृताला थप्पड मारली कारण तिने मला शिवीगाळ केली होती आणि मी तिला माझ्या स्वाभिमानासाठी मारलं होतं. याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही.”
असे अनेक प्रकार सेलिब्रिटींसोबत घडले आहेत आणि नेहमीच घडतात.