Big Boss: राजू श्रीवास्तवपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत ‘बिग बॉस’च्या ‘या’ कलाकारांनी तरुण वयातच घेतला जगाचा निरोप
मागील काही वर्षांत 'बिग बॉस'चे सहभागी राहिलेल्या कलाकारांचा कमी वयातच निधन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव , अभिनेता सिद्धार्थ शुक्लासारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
![Big Boss: राजू श्रीवास्तवपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत 'बिग बॉस'च्या 'या' कलाकारांनी तरुण वयातच घेतला जगाचा निरोप Big Boss: राजू श्रीवास्तवपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत 'बिग बॉस'च्या 'या' कलाकारांनी तरुण वयातच घेतला जगाचा निरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/09/22205525/New-Project-2022-09-22T152515.935.jpg?w=1280)
टीव्हीवरील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस'(Big Boss ) सहभागी स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले दिसून येतात.याच बरोबरच मागील काही वर्षांत ‘बिग बॉस’चे सहभागी राहिलेल्या कलाकारांचा कमी वयातच निधन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Comedian Raju Srivastava)पासून अभिनेता सिद्धार्थ शुक्लापर्यंत (Siddharth Shukla) अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. हे सर्व कलाकार सलमान खानच्या शोचा एक भाग होते , मात्र त्यांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला.
राजू श्रीवास्तव
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने महिनाहून अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हृदयविकारा झटका आल्यापासून राजू व्हेंटिलेटरवर होते. मधल्या काळात त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली होती, पण आता २१ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.राजू ते बिगबॉस ३ मध्ये ते सहभागी झाले होते.
सोनाली फोगट
हरियाणाची अभिनेत्री सोनाली फोगाट कलाकार तसेच राजकारणी देखील होती आणि ती ‘बिग बॉस 13’ मध्ये दिसली होती. सोनाली तिच्या टिकटॉक व्हिडिओंतून प्रसिद्धीस आली होती. सोनालीने यावर्षी 22 ऑगस्ट रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या हत्येचा आरोप त्याच्या पीएवर आहे.याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/02221111/jamir-sayyad-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/02220050/Ajit-Pawar-and-Raj-Thackeray.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/02022215/Raj-Thackeray-2.jpg)
स्वामी ओम
‘बिग बॉस 10’मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धक म्हणून स्वामी ओम ओळखले जात होते . शोमधील त्याच्या विचित्र कृत्यामुळे ते खूप चर्चेत होते. गेल्या वर्षी कोरोना महामारीत त्यांचा मृत्यू झाला.
सिद्धार्थ शुक्ला
2021 मध्ये ‘बिग बॉस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.शहनाज गिल व सिद्धार्थ शुक्लाची बिगबॉसच्या घरात सुरू झालेली लव्हस्टोरी खूप गाजली होती.
प्रत्युषा बॅनर्जी
‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी देखील ‘बिग बॉस 7’ चा भाग होती. 2016 मध्ये प्रत्युषा तिच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिने आत्महत्या केली होती.