Queen Elizabeth: सुष्मिता सेन ते पॅरिस हिल्टनपर्यंत ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी ‘सम्राज्ञी एलिझाबेथ’ यांना वाहिली श्रद्धांजली

याशिवाय करीना कपूर खान, नीतू कपूर, मिमी चक्रवर्ती आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या स्टार्सनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर हॉलिवूड कलाकारांनीही राणीच्या स्मरणार्थ शोक व्यक्त केला आहे.

Queen Elizabeth: सुष्मिता सेन ते पॅरिस हिल्टनपर्यंत या बॉलीवूड कलाकारांनी सम्राज्ञी एलिझाबेथ यांना वाहिली श्रद्धांजली
Queen Elizabeth
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 09, 2022 | 1:53 PM

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth)ही ब्रिटनच्या सिंहासनावर सर्वात जास्त काळ राज्य करणारी सम्राट होती. त्यांनी 70 वर्षे राज्य केले. राणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे ब्रिटनमध्ये  राष्ट्रीय दुखवटा पळाला जात आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर जगभरातील राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे, मात्र हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंतच्या(Bollywood) अनेक कलाकारांनीही राणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली (Tribute)वाहिली आहे.

सुष्मिता सेन, पॅरिस हिल्टन आणि नीतू कपूर यांसारख्या अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड कलाकारांनी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तारे म्हणतात की राणी एलिझाबेथसह एक युग संपले आहे. सुष्मिता सेनने शोक व्यक्त करताना लिहिले – किती अविश्वसनीय जीवन होते. त्यांना रंग आवडत होते व आयुष्यातला प्रत्येक रंग त्या जगल्या. संपूर्णपणे राणीचे मूर्त रूप होते. राणी एलिझाबेथ तुमच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हटले आहे.

अभिनेत्री आणि क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा यांनीही राणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गीता बसरा यांनी लिहिले की हा एक अतिशय दु:खद दिवस आहे. खरंच एका युगाचा अंत झाला, काय आयुष्य आणि काय स्त्री आहे. अत्यंत प्रामाणिकपणाने आणि धैर्याने देशाचे नेतृत्व केल्याबद्दल महामहिमांचे आभार… तुम्ही एका शक्तिशाली स्त्रीचे प्रतीक होता. असे म्हटले आहे.

अभिनेता रितेश देशमुखने लिहिले – एका युगाचा शेवट. कठीण काळातही त्याने कधीही आपल्या प्रतिष्ठेला तडा जाऊ दिला नाही. आजचा दिवस खरोखरच दुःखद आहे, ब्रिटनमधील कुटुंब आणि नागरिकांच्या प्रती शोक व्यक्त करतो.

याशिवाय करीना कपूर खान, नीतू कपूर, मिमी चक्रवर्ती आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या स्टार्सनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर हॉलिवूड स्टार्सनीही राणीच्या स्मरणार्थ शोक व्यक्त केला आहे.

अभिनेत्री आणि गायिका पॅरिस हिल्टनने तिच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये खूप लोक जमले आहेत. हे छायाचित्र शेअर करत पॅरिसने लिहिले – प्रेरणादायी महिलांपैकी एक, एका युगाचा अंत.