Year Ender 2024 : ‘आज की रात’ ते ‘तौबा-तौबा’ पर्यंत… 2024मध्ये या गाण्यांनी घातला धुमाकूळ, तुमच्याही प्ले लिस्टमध्ये आहेत का ?
2024 संपण्यापूर्वी आज या वर्षातील काही ट्रेंडिंग गाण्यांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्ही मित्रांसोबत हँग आउट करताना किंवा एकट्याने प्रवास करताना देखील ऐकू शकता. गाणी ऐकल्याने अंगात जोष तर येतोच. तुमच्या यादीत अशी बरीच गाणी असतील जी तुम्ही ऐकत असाल
2024 हे वर्ष तर आता संपतच आलंय. हे वर्ष काही चित्रपटांसाठी खास ठरलं तर काही चित्रपट मात्र फ्लॉप ठरले. मात्र असं असलं तरी काही चित्रपटांची गाणी ही खूप उत्तम ठरली, ती गाणी ट्रेंडमध्ये होती आणि मोठ्या प्रमाणात ऐकली गेली. 2024 संपण्यापूर्वी आज या वर्षातील काही ट्रेंडिंग गाण्यांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्ही मित्रांसोबत हँग आउट करताना किंवा एकट्याने प्रवास करताना देखील ऐकू शकता. गाणी ऐकल्याने अंगात जोष तर येतोच. तुमच्या यादीत अशी बरीच गाणी असतील जी तुम्ही ऐकत असाल. पण आज आम्ही तुम्हाला या वर्षातील अशाच 7 गाण्यांबद्दल सांगणार आहोत, जी लोकांच्या ओठी बराच काळ राहिली आणि ती तुम्ही प्लेलिस्टमध्ये नक्कीच ॲड करू शकता.
1. हीर आसमानी (फायटर)
‘फायटर’ चित्रपटातील ‘हीर आसमानी’ हे गाणे विशाल-शेखर यांनी कंपोझ केले असून ते बी प्राकने गायले आहे. या गाण्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची जोडी पाहायला मिळाली. चित्रपटातील हे गाणे खूप गाजलं.
2. अखियां गुलाब (तेरी बातों में ऐसा उलझा जिया)
या लिस्टमधलं पुढलं गाणं आहे ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ मधील ‘अखियां गुलाब’ हे आहे. या गाण्यात शाहिद कपूर आणि कृति सेनन यांची जोडी दिसली. हे गाणंही खूप गाजलं.
3. सोना कितना सोना है (क्रू)
चला या यादीतल पुढलं गाणं पाहूया, ते म्हणजे ‘क्रू’ चित्रपटातील ‘सोना कितना सोना है’. हे गाणे आयपी सिंग आणि नुपूर खेडकर यांनी गायले आहे. या गाण्यात करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू झळकल्या.
4. तौबा तौबा (बॅड न्यूज)
‘तौबा तौबा’ या गाण्याशिवाय तर हे वर्ष आणि आपली प्लेलिस्ट पूर्ण होऊच शकत नाही.अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील हे गाण सुपरहिट ठरलं. औजला याने लिहीलेलं आणि कंपोज केलेल्या या गाण्यात विकी कौशलने अप्रतिम डान्स केलाय. हा चित्रपट फार चालला नाही पण गाणयाने धूमाकूळ माजवला.
5. आज की रात (स्त्री 2)
या वर्षातील दुसरे सर्वात हिट गाणे म्हणजे ‘आज की रात’. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री 2’ मधील हे गाणंही प्रचंड गाजलं असून अभिनेत्री तमन्नावर चित्रीत करण्यात आलं आहे. मधुवंती बागची आणि दिव्या कुमार यांनी हे गाणं गायलं असून सचिन-जिगर आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी संगीतबद्ध केले आहे.
6. तैनु संग रखना (जिगरा)
आलिया भट्ट आणि वेदांग रैनाच्या ‘जिगरा’ चित्रपटातील हे गाणे अतिशय सुंदर आहे. अरिजित सिंग, अनुमिता नादसन आणि अचिंत ठक्कर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर अचिंत ठक्कर यांने ते कंपोझ केलं आहे.
7. सोनी सोनी (इश्क विश्क रीबाउंड)
‘सोनी सोनी’ हे पण एक उत्तम गाणं आहे. रोहित सराफ आणि पश्मीना रोशन यांच्यावर शूट करण्यात आलेलं हे गाणं को दर्शन रावल, जोनिता गांधी आणि रोचक गांधी यांनी गायलं आहे.