मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या ‘गरद २’ सिनेमाचा बोलबाला सर्वत्र पहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, अनेक वर्षांनंतर ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल यांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी अभिनेत्री ईशा देओल हिने सनी आणि बॉबी देओल यांच्या कुटुंबासाठी ‘गदर २’ सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवलं होतं. सिनेमामुळे धर्मेंद्र यांची मुलं एकत्र आली. एवढंच नाही तर, सनी – बॉबी देओल यांनी सावत्र बहिणींसोबत फोटोसाठी पोज देखील दिल्या.
सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबाची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल यांच्या फोटो, व्हिडीओंची चर्चा रंगत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ धर्मेंद्र त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. पण धर्मेंद्र यांनी कोणतेही कॅप्शन लिहिलेलं नाही…
अनेक वर्षांनी दोन्ही पत्नींच्या मुलींना एकत्र पाहिल्यानंतर धर्मेंद्र भावुक आणि अत्यंत आनंदी असतील… अशी चर्चा रंगत आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अद्याप अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सध्या सर्वत्र धर्मेद्र यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
सध्या सर्वत्र ‘गरद २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने तीन दिवसांत चक्का १३३.१८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने ४० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने ४३ कोटी रुपयांची कमाई केली असून तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सिनेमाने तब्बल ५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत असलेल्या देओल कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब कायम त्यांच्या पहिल्या कुटुंबापासून दूर असतं. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या मुलाचं लग्न झालं, तेव्हा देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या. पण ईशा देओल हिने करण देओल याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी सर्व मर्यादा ओलांडून फक्त भावनांना महत्त्व दिलं. आज त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर येत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण अद्यापही धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी हेमा मालिनी यांनी पाय ठेवलेला नाही. पण आता व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे देओल कुटुंब चर्चेत आलं आहे.