मुंबई : ‘गंदी बात’ फेम टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने रविवारी अटक केली होती. अडल्ट व्हिडीओ शूटिंग शेअर केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. गहना सध्या भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच तुरुंगात तिची तब्येत पुन्हा ढासळली आहे. या दरम्यान तिला रुग्णालयातही नेण्यात आले आहे. वृत्तानुसार, गहनाला शुक्रवार आणि शनिवारी तुरूंगातून बाहेर नेण्यात आले होते. तिची तब्येत खूपच बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या गहानाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता (Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail).
अभिनेत्री गहना वशिष्ठ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच, तिची चौकशी करणार्या गुन्हे शाखेच्या 6 अधिकाऱ्यांना देखील अलगीकरणात ठेवण्यात आले होते. अश्लील व्हिडीओ शूटिंग आणि अपलोड करण्यासाठी ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक करण्यात आली होती.
‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे गहना वशिष्ठ प्रकाशझोतात आली होती. गहनाने आतापर्यंत आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. तिचे खरे नाव वंदना तिवारी असे आहे. वंदना ही मूळची छत्तीसगढची असून तिचे वडील शिक्षण विभागात अधिकारी आहेत. ‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. त्यामुळे गहनाच्या अटकेने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात (Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail).
चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मड बेटावर काही खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मोठ्या हुशारीने पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना चित्रपटात मोठं काम देतो, असं सांगून अश्लील व्हिडीओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली, ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती.
लॉकडाऊनच्या काळातही या पॉर्न रॅकेटचे काम जोरात सुरु होते. याच काळात अनेक अश्लिल चित्रपटांची शुटिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या रॅकेटच्या माध्यमातून एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायही केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापैकी काही मॉडेल्स आणि अन्य लोकांचा बॉलीवूडशी संबंध असल्याचेही समजते.
(Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail)
Marathi Movie : प्रियदर्शन जाधवचं ‘लव्ह सुलभ’; चित्रीकरणाला सुरुवातhttps://t.co/glMJBG8tXE#LoveSulabh @prizadhavv #PriyadarshanJadhav
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021