Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे उरले तर मला द्या… बॉलिवूडमध्येही हवा करणाऱ्या अभिनेत्याचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्यूशन

बॉलिवूड चित्रपट, सीरिज, मालिका ते रिअॅलिटी शो केलल्या एका मराठी अभिनेत्याने मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं कॉन्ट्रिब्यूशन दिलं आहे. त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पैसे उरले तर मला द्या... बॉलिवूडमध्येही हवा करणाऱ्या अभिनेत्याचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्यूशन
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 8:32 PM

मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. ज्यांनी कोणत्याही गॉड फादर शिवाय केवळ आपल्या मेहनतीच्या दोरावर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपली खास जागा निर्माण केली आहे. त्यातील असा एक अभिनेता आहे जो मराठी मातीतला आहे मात्र त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हिंदीमध्येही आपली छाप पाडली आहे.

गश्मीर महाजनीचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्यूशन

अनेक मराठीसह हिंदी चित्रपट, सिरिअल्स, वेब सिरीजमध्ये अभिनेत्याने काम केलं आहे. एवढच नाही तर या अभिनेत्याने आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्यूशनही दिलं आहे.

हा अभिनेता आहे हॅंडसम हंक गश्मीर महाजनी. मुस्कुरके देख जरा मधला विवेक ते एक राधा एक मीरा मधला कृष्णा, प्रेमा तुझा रंग कसा मधला यजमान ते खतरो के खिलाडी, श्रीकांत बशीर, गुनाह यांसारख्या वेब सिरीज आणि चित्रपटातून तो प्रेक्षकांचा समोर आला आणि त्याने त्याचा चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

चित्रपटांच्या फीबद्दल गश्मीरचा महत्त्वाचा निर्णय

गश्मीर अभिनयासोबतच डान्ससाठीही तेवढाच चर्चेत असतो. एवढच नाही तर गश्मीरने मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्यूशन दिलं आहे. पण ते एका वेगळ्या स्वरुपात. जिथे चित्रपटांसाठी स्क्रिप्टसोबतच मानधन किंवा फी आधी सांगितले जाते तिथे मात्र गश्मीरने एक वेगळाच निर्णय घेतला.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, गश्मीरने या कॉन्ट्रिब्यूशनबद्दल सांगितलं. तो म्हमाला “मी मराठी चित्रपट करताना निर्मात्यांनी विचारल्यावर माझी फी सांगतो पण, मी त्यांना सांगतो की हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पैसे उरले तर मला द्या… नाही तर आपला चित्रपट रिलीज झाल्यांनतर प्रॉफिट झाला तर मला पैसे द्या. मी पैसे कमवण्याचे इतर मार्ग शोधतो, मी हिंदी टिव्ही शो, वेब सिरीज करून त्यातून पैसे कमावतो. मराठी सिनेमाकता हे माझं कॉन्ट्रिब्यूशन आहे. मराठी सिनेमाला सध्या पुशची गरज आहे आणि हे माझ्या कडून थोडं काँट्रीब्यूशन आहे असं मी मानतो.” असं म्हणत त्याने मराठी इंडस्ट्रीसाठी हे खूप मोठं पाऊल उचललं आहे. गश्मीरच्या या निर्णयाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे.

‘एक राधा एक मीरा’

दरम्यान गश्मीरचा ‘एक राधा एक मीरा’ हा चित्रपट लवकरचं मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. 7फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील कृष्णाची भूमिकेत गश्मीर महाजनी दिसणार आहे. चित्रपटात एक कॅन्डी फ्लॉस रोमान्स पाहायला मिळणार असल्याचंही त्याने सांगितलं.

'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला.
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video.
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल.
'गुणरत्न सदावर्ते हा फालतू अन्..', मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
'गुणरत्न सदावर्ते हा फालतू अन्..', मनसे नेत्याची जिव्हारी लागणारी टीका.
संतोष देशमुख प्रकरणात असीम सरोदेंची मोठी मागणी; कोण येणार अडचणीत?
संतोष देशमुख प्रकरणात असीम सरोदेंची मोठी मागणी; कोण येणार अडचणीत?.
'परब म्हणजे शिवरायांच्या पायाची धूळ पण..', शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
'परब म्हणजे शिवरायांच्या पायाची धूळ पण..', शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात.
पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि.. , शिंदेंची ठाकरेंवर टीका
पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि.. , शिंदेंची ठाकरेंवर टीका.
'त्या' व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत
'त्या' व्हिडिओवरील खुलाशाने जरांगे पाटील संतापले, पाहा खास मुलाखत.
एक तालुका, एक बाजार समिती करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
एक तालुका, एक बाजार समिती करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.
'औरंगजेब चोर होता, त्याची कबर JCB नं...'; उदयनराजे भोसले भडकले
'औरंगजेब चोर होता, त्याची कबर JCB नं...'; उदयनराजे भोसले भडकले.