Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानचा ‘टिकटॉकर’सह साखरपुडा, डिसेंबरमध्ये ‘निकाह’चा मुहूर्त!

गौहर खानने जैद दरबारसह साखरपुड्याचे फोटो शेअर करत, त्यांच्या नात्याबद्दल जाहीर कबुली दिली आहे.

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानचा ‘टिकटॉकर’सह साखरपुडा, डिसेंबरमध्ये ‘निकाह’चा मुहूर्त!
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 3:24 PM

मुंबई :बिग बॉस’च्या 7व्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध टिकटॉकर जैद दरबारसह (Zaid Darbar) गौहरने साखरपुडा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मनोरंजन विश्वात त्याच्या नात्याची जोरदार चर्चा होती. आता खुद्द गौहरने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Gauahar Khan And Zaid Darbar engagement).

गौहर खानने जैद दरबारसह साखरपुड्याचे फोटो शेअर करत, त्यांच्या नात्याबद्दल जाहीर कबुली दिली आहे. या फोटोमध्ये झैद आणि गौहर हसत हसत एकमेकांकडे पहात आहेत आणि गौहरच्या हातात एक फुगा आहे, ज्यावर ‘शी सेड येस’ असे लिहिले आहे.

गौहर खान आणि जैद दरबारच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. आता त्यांच्या चाहत्यांना गौहर आणि जैदच्या लग्नाची उत्सुकता आहे. (Gauahar Khan And Zaid Darbar engagement)

View this post on Instagram

?♥️ @zaid_darbar

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

डिसेंबरमध्ये निकाहाचा मुहूर्त!

रिपोर्ट्सनुसार, गौहर आणि जैद 22 नोव्हेंबरला लग्न करणार होते. परंतु, आता ही तारीख पुढे ढकलली गेली आहे. आता 24 डिसेंबर रोजी दोघे लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचा जंगी सोहळा 2 दिवस चालणार आहे. गौहर आणि जैद याचा निकाह मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

जैदच्या वडिलांची प्रतिक्रिया

जैद दरबार हा संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. जैदच्या लग्नावर वडील इस्माईल दरबार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘आम्हाला त्यांच्या नात्याबद्दल काही अडचण नाही. या नात्यास आम्ही आधीच सहमती दिली आहे. मुलांना जे करायचे आहे, ते त्यांनी करावे. आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत.’ अद्याप जैद आणि गौहर यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Gauahar Khan And Zaid Darbar engagement)

नेहा कक्कर, जय भानुशाली, सुनील ग्रोव्हर, मेघना नायडू, मंदाना करीमी, विशाल दादलानी, किश्चर मर्चंट, सुगंधा मिश्रा, नेहा धुपिया, माही विज या कलाकारांनी जैद आणि गौहरचे अभिनंदन केले आहे.

‘तूफानी सिनिअर’ गौहर

सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व गाजते आहे. या पर्वात नव्या स्पर्धकांसह काही जुन्या स्पर्धकांनादेखील काही दिवसांसाठी घरात प्रवेश देण्यात आला होता. तूफानी सिनिअर बनून घरात गेलेल्या स्पर्धकांमध्ये गौहर खान, हीना खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा समावेश होता. या तिघांच्या हातात संपूर्ण घराची धुरा सोपवण्यात आली होती. 2 आठवड्यांपर्यंत बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर गौहर आणि जैद सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात गेले.

(Gauahar Khan And Zaid Darbar engagement)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.