शाहरूखची पत्नी गौरी खानला नेटकरी का म्हणतायत कोमोलिका, व्हँप?; तो व्हिडीओ व्हायरल
गौरी खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील तिच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना कोमोलिका'शी केली आहे. काही लोकांना तिचा लूक आवडला आहे तर काहींनी खिल्ली उडवली आहे.

बॉलिवूडमधील खऱ्या आयुष्यातील सर्वात लाडकी जोडी म्हणजे शाहरूख खान आणि गौरी खान. सर्वांनाची ही गोड जोडी आवडते. त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि त्यांनी दिलेली एकमेकांची साथ याबद्दलचे किस्से सर्वांना माहित आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरेत या जोडीबद्दल तेवढा आदर नक्कीच आहे. पण सध्या गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून तिच्यासाठी अनेक कमेंट्स येत आहेत. त्या व्हिडीओमधील तिचा लूक पाहून नेटकरी तिला कोमोलिका,सिरीअल व्हँप अशा कमेंट्स केल्या आहेत.
गौरी खानची तुलना व्हँपसोबत
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्याचबरोबर त्यांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. अनेकदा दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, शाहरूख खानची पत्नी गौरी खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिची तुलना टीव्ही मालिकेतील व्हँपशी करत आहेत.
गौरीचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
90 च्या दशकात शाहरुख खानची पत्नी गौरी खान तिच्या सौंदर्यासाठी, केशरचनासाठी आणि मेकअपसाठी ओळखली जात असे. या काळात तिची तुलना मेघना गुलजार आणि महिमा चौधरी सारख्या अनेक अभिनेत्रींशी करण्यात आली. गौरी खान बॉलीवूडच्या पार्टी असतील किंवा कोणता पुरस्कार सोहळा असेल तेव्हा सर्वोत्तम पोशाख घालून उपस्थित राहायची. असाच एक तिचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौरी तिच्या हटके स्टाईलमध्ये तयार झालेली दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गौरीने साडी नेसली असून लांब बिंदी आणि सिंदूर लावलेला दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
‘कोमोलिका’ सारखी दिसतेय’
गौरी खानच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘ती अगदी टीव्ही मालिकेतील ‘कोमोलिका’ सारखी दिसतेय.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘ती खरोखरच क्लासी, सुंदर दिसते.’ याशिवाय काही लोकांनी तिची तुलना प्रियांका चोप्राशी केली. एका युजरने लिहिले, ‘ती प्रियांका चोप्रासारखी दिसतेय’. पण खरोखरच गौरीचा तेव्हाचा लूक आणि आताचा लूक यात किती फरक आला आहे, वेगळेपण आलं आहे हे नक्कीच दिसून येतं.